ओढ लावती अशी जिवाला गावाकडची माती! शेऱ्यातील मंदिरासाठी निवृत्त उपायुक्तांकडून तीन लाखांची मदत

अमोल जाधव
Friday, 22 January 2021

मुंबईत स्थायिक प्रमोद खेडकर यांचे वडील पिलाजी खेडकर हे कऱ्हाड पालिकेत शिक्षक होते.

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : शेरे येथील ग्रामदैवत श्री निनाई मंदिराच्या शिखराच्या जीर्णोद्धाराचे काम ग्रामस्थांनी हाती घेतल्याचे समजताच मुंबईस्थित भूमिपुत्र व मुंबई महानगरपालिकेचे निवृत्त उपायुक्त प्रमोद पिलाजी खेडकर यांनी शिखर कामासाठी सुमारे तीन लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे. 

मुंबईत स्थायिक श्री. खेडकर यांचे वडील पिलाजी खेडकर हे कऱ्हाड पालिकेत शिक्षक होते. ग्रामदेवतांच्या दर्शनासाठी हे कुटुंब नेहमी गावी येते. नुकतेच श्री. खेडकर हे सपत्नीक शेरे येथे देवदर्शनासाठी आले होते. तेथे त्यांनी निनाई मंदिराच्या शिखर कामाचा जीर्णोद्धार सुरू असल्याचे बघितले. त्यावेळी खर्चाविषयी अधिक माहिती जाणून घेतली. या कामी सुमारे दोन लाख 91 हजार रुपये खर्च असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

Breaking News : उदयनराजेंसह 11 कार्यकर्ते निर्दाेष; वाई न्यायालयाच निर्वाळा

लोकवर्गणीतून हे काम सुरू असल्याची माहिती मिळताच श्री. खेडकर यांनी हा सर्व खर्च स्वतः करण्याचे जाहीर केले. त्या खर्चाचा धनादेश त्यांनी ग्रामस्थांकडे सुपूर्द केला. यावेळी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब निकम, अशोकराव पाटील, आनंदा निकम, जगदीश गुरव, सुनील सावंत, ग्रामपंचायत सदस्य समीर पाटील उपस्थित होते. श्री. खेडकर यांच्या या दानशूरपणाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 

सरकारी कर्मचाऱ्यांनाे! BSNLने तुमच्यासाठी आणलीय खास याेजना

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Three Lakh Assistance From A Municipal Official For The Temple At Shere