हे सगळं माझ्याच वाट्याला का, हा विचार बाजूला करुन त्यांनी शाळेचे रुपडेच पालटले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

त्यातूनच मग 14 दिवसांच्या रिकाम्या वेळात आपण गावातील शाळेसाठी काय करू शकतो, या विचारांची ठिणगी पेटली. आपण आपल्या शाळेसाठी स्वच्छता मोहीम व सुशोभीकरण करायचे ठरले. कामाला सुरुवात झाली.

वाई (जि.सातारा)  शिरगाव (ता. वाई) येथे लॉकडाउनच्या काळात पुण्या, मुंबईतून आलेल्या चाकरमान्यांनी श्रमदान करून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचा परिसर स्वच्छ करून आगळावेगळ्या पद्धतीने क्वारंटाइन आनंद लुटला. त्यामुळे शाळेचे रुपडे पालटले.
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

शिरगावात मुंबई, पुणे व इतर शहरातून अनेक जण दाखल झाले. आपत्ती व्यवस्थापन समिती व गाव प्रशासन यांच्या अनुमतीने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बाहेरून आलेल्या सर्व लोकांना गावच्या लोकवस्तीपासून लांब ठेवण्याचा निर्णय झाला. त्यानुसार आलेल्या सर्व लोकांची व्यवस्था जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत करण्यात आली. एकापाठोपाठ एक चाकरमानी गावात दाखल होत होते. दुसरीकडे कुठेच व्यवस्था नसल्याने त्यांना शाळेत राहण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. एकूण 28 जण क्वारंटाइनमध्ये होते. सुरुवातीचे दाेन चार दिवस दुःखात, तणावात किंवा हे सगळं माझ्याच वाट्याला का, याच विचारात गेले; पण जसजशी लोकांची संख्या वाढली. तसे या लोकांना समजू लागले. ज्या लोकांना आपण कधी पहिलेच नव्हतं ती लोक आज एकत्र भेटू लागली आहेत. त्यातून गप्पा, गोष्टी होऊ लागल्याने आता त्यांचे मन आता रमू लागले होते. विविध स्वभावाचे, विचाराचे लोक कुटुंबीयांसह एकत्र आल्याने गप्पा गोष्टीतून एकमेकांच्या विचारांचे आदानप्रदान सुरू झाले. 

त्यातूनच मग 14 दिवसांच्या रिकाम्या वेळात आपण गावातील शाळेसाठी काय करू शकतो, या विचारांची ठिणगी पेटली. आपण आपल्या शाळेसाठी स्वच्छता मोहीम व सुशोभीकरण करायचे ठरले. कामाला सुरुवात झाली. सर्व जण कामाला लागली अन्‌ बघता बघता मैदान साफ झालं. झाडांना आळी झाली, बागकाम झालं, पाण्याचे पाट उकरून सर्व झाडांना पाणी पण दिल गेलं, सगळा पालापाचोळा एकत्र करून त्याची व्यवस्थितरीत्या विल्हेवाट लावली आणि एकदम शाळेचं रुपडंच पालटलं. चाकरमान्यांच्या या कार्याचे आपत्ती व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ मंडळाने कौतुक करून त्यांचे स्वागत केले. 

सातारा : युवकाचा दगडाने ठेचून खून

कोरोनाने फेरले त्यांच्या निरोपाच्या क्षणांवर पाणी... 

ती म्हणते लाॅकडाऊनमुळे नात्यांची वीण झाली घट्ट

सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यातील ही गावे वगळू नका; काेणी केली सरकारला मागणी, पर्यावरणप्रेमींनी नक्की वाचा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Quarantine Mumbai Citizens Renovated Shirgaon School