esakal | पोटापाण्यासाठी मैलोनमैल भटकणाऱ्या 50 कुटुंबांना तहसीलदारांचा 'आधार'
sakal

बोलून बातमी शोधा

Tehsildar Amardeep Wakade

गावी उदरनिर्वाहाचे साधन नसल्यामुळे एका समाजातील लोक हजारो किलोमीटर दूरवरुन येवून पुणे-बेंगळुरु महामार्गालगत असलेल्या वाठार या गावी पालांत राहत आहेत.

पोटापाण्यासाठी मैलोनमैल भटकणाऱ्या 50 कुटुंबांना तहसीलदारांचा 'आधार'

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : पोटापाण्याचा प्रश्न सोडण्यासाठी मैलोनमैल पायपीट करुन एका समाजातील लोक वाठार (ता. कऱ्हाड) येथे 20 वर्षांपासून वास्तव्यास आहेत. मजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्याचा हा त्यांचा दिनक्रम. मात्र, त्यांच्याकडे रेशनिंग कार्ड (Ration Card) नसल्याने त्यांना शासनाच्या कोणत्याही योजनेचा (Government Schemes) लाभ घेता येत नव्हता. तहसीलदार अमरदीप वाकडे (Tehsildar Amardeep Wakade) यांच्या ही बाब लक्षात येताच, त्यांनी यंत्रणा कामाला लावून कागदोपत्री पूर्तता करुन घेवून संबंधित 50 कुटुंबांना तेथे जावून रेशनिंग कार्डाचे वाटप केले. आयुष्यात पहिल्यांदाच कार्ड मिळाल्याने त्यांचा आनंद गगणात मावत नव्हता. (Tehsildar Amardeep Wakade Distributed Ration Cards To 50 Families In Karad Satara Marathi News)

गावी उदरनिर्वाहाचे साधन नसल्यामुळे एका समाजातील लोक हजारो किलोमीटर दुरवरुन येवून पुणे-बेंगळुरु महामार्गालगत (Pune-Bangalore Highway) असलेल्या वाठार या गावी पालांत राहिली आहेत. मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा हा त्यांचा शिरस्ता. २० वर्षापासून ५० कुटुंबे तेथे राहत आहेत. त्यांची मुले मोठी झाल्यावर त्यांना शाळेत घालताना, पत्ता देताना त्यांना अडचणी आल्या. त्यामुळे काही वर्षापूर्वी रेशनिंग कार्डासाठी अनेकदा तहसीलदार कार्यालयात हेलपाटे मारुन ते आले. मात्र, त्यांना रहिवाशी पुरावा किंवा ओळख नसल्याने रेशनिंग कार्ड मिळत नव्हते.

हेही वाचा: माझी वसुंधरा पुरस्काराला कऱ्हाडची गवसणी; राज्यात पालिकेचा दुसरा क्रमांक

त्याची माहिती तहसीलदार वाकडे यांना मिळाली. त्यांनी त्या कुटुंबाची वाठारला जावून पाहणी केली. खातरजमा केल्यावर तहसीलदार वाकडे यांनी पुरवठा निरीक्षक गोपाल वसू, अव्वल कारकून श्री. गबाले, मंडल अधिकारी ढाणे यांना संबधितांच्या रेशनिंग कार्डसाठी कागदपत्रे तयार करायला सांगितली. त्यानंतर रेशनिंग कार्ड तयार करुन ते स्वतः वाठार येथील पालातील जावून त्याचे वाटप केले. त्याचबरोबर संबंधित गावातील धान्य दुकानदारांकडून त्या कुटुंबांना धान्य देण्याचीही व्यवस्था त्यांनी केली आहे. त्यामुळे त्या कुटुंबांचा आनंदाला पारावार उरला नव्हता.

हेही वाचा: VIDEO पाहा : जावळीत ग्रामीण परंपरेची 'साक्ष'; जात्यावरच्या ओव्यांतून कोरोना जागृती

वाठारच्या ५० कुटुंबाना रेशनिंग कार्ड नसल्याने आणि लॉकडाउन असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. त्याची माहिती मिळाल्यावर तेथे जावून पाहिल्यावर फारच विदारक परिस्थिती होती. त्यांना तातडीने रेशनिंग कार्ड आणि धान्यही उपलब्ध करुन दिले आहे.

-अमरदीप वाकडे, तहसीलदार, कऱ्हाड

Tehsildar Amardeep Wakade Distributed Ration Cards To 50 Families In Karad Satara Marathi News

loading image
go to top