शाहूनगरमधील युवकांनी परप्रांतीय आजींना दिली मायेची ऊब

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 December 2019

थंडीत रस्त्यावर अनेक निराधार वृद्ध झाेपलेले असतात. या वृद्धांना सामाजिक कार्यकर्ते यशोधन निवारा केंद्रात नेऊन दाखल करतात.

सातारा : शहरालगतच्या शाहूनगर, गोळीबार मैदान परिसरात एक परप्रांतीय आजी दिवसरात्र फिरत होती. भीक मागून गुजरण करत होती. तिला स्वराज्यनगर, शाहूनगरमधील युवकांनी अजिंक्‍य बझार चौक येथून रिक्षाने यशोधन निवारा केंद्रात दाखल केले. त्यामुळे या आजीला आता कायमचा आश्रय मिळाला असून, मायेची ऊब मिळणार आहे.

हेही वाचा - धावताय... अशी घ्‍या हृदयाची काळजी
 
सातारा शहर परिसरात अनेक भिकारी भीक मागत फिरत असतात. मिळणाऱ्या भिकेतून आपली गुजरण करतात. शहरालगतच्या शाहूनगर, गोळीबार मैदान या परिसरात एक परप्रांतीय वयोवृद्धा भीक मागत फिरत होती.

परप्रांतीय असल्याने तिला मराठी, हिंदी भाषाही समजत नव्हती. ती मनोरुग्ण असल्याने बडबडही करत होते. थंडीच्या वातावरणातही ती कोठेही थांबत होती. गोळीबार मैदानातील स्वराज्यनगर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष धनेश खुडे, महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष सनी भिसे यांना वयोवृद्धा अजिंक्‍यबझार चौकात रात्री दहाच्या सुमारास बसलेली आढळली. चौकशी केली असता तिला भाषाच समजत नव्हती.

अवश्य वाचा - पुण्यातील युवकाने मित्रांना 20 लाखांना फसविले

तेव्हा धनेश खुडे याने यशोधन निवारा केंद्राचे ट्रस्टी रवी बोडके यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी वृद्धेला घेऊन येण्यास सांगितले. धनेश खुडे, सनी भिसे यांना विनोद यादव, तुषार साठे, अनिकेत भिसे, शुभम भिसे, संकेत खुडे, सौरभ माने, अभय रोकडे, तेजस भिसे आदींनी सहकार्य केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Came Forward To Admit Older Lady In Orphanage