esakal | शाळेची पहिली घंटा 15 जुलैपासून वाजणार; प्रशासनाकडून हालचाली
sakal

बोलून बातमी शोधा

शाळेची पहिली घंटा 15 जुलैपासून वाजणार; प्रशासनाकडून हालचाली

शाळेची पहिली घंटा 15 जुलैपासून वाजणार; प्रशासनाकडून हालचाली

sakal_logo
By
तुषार सावंत

कणकवली : जिल्ह्यातील जी गावे कोरोनामुक्त झाली आहेत, अशा गावांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. पालकांच्या लेखी परवानगीबरोबरच कोरोनाचे सर्व नियम पाळून १५ जुलैपासून शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. (school start) राज्यातील कोरोना (covid-19) साथरोग नियंत्रणात येत असताना आता शाळा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ऑनलाईन शिक्षणात (online education) अनेक अडचणी आल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होते. त्यामुळे आता गतवर्षीप्रमाणे आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. (sindhudurg district)

ज्या गावांमध्ये गेल्या महिन्याभरात कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही, अशा गावांमध्ये शाळा सुरू करण्यासाठी गाव स्तरावर समिती स्थापन केली जाणार आहे. शाळेत येणाऱ्या मुलांच्या पालकांनी लेखी संमती देऊनच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे. या संदर्भात राज्याने परिपत्रकात १५ जुलैपासून कोरोनामुक्त (covid-19 free) क्षेत्रात शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यासाठी ग्रामपंचायतीने ठराव करून शासनाने ठरवलेल्या निकषानुसार पहिल्या टप्प्यात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

हेही वाचा: दिलासा; पणदेरी धरणातील पाणी कमी करण्यात यश; यंदा पाणीसाठा नाही

कोरोनामुक्त गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारितील असणाऱ्या गावातील शाळा आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत पालकांशी चर्चा करून तसा ठराव करावा, असे शासन आदेशात म्हटले आहे. शाळा सुरू करताना मुलांना टप्प्याटप्प्यात शाळेत बोलविण्यात येणार आहे. कोरोना विषयीचे नियम काटेकोरपणे पालन केले जाणार आहेत. संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था ही शक्यतो त्याच गावात करावी. सार्वजनिक वाहतुकीचा वापर शिक्षकांनी करू नये, अशाही सूचना शासनाने दिल्या आहेत.

ऑनलाईन शिक्षणामध्ये अडचणी आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात अद्यापही नेटवर्क विस्तारलेले नाही. परिणामी गेल्या दोन वर्षापासून विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहे. अनेक विद्यार्थ्यांकडे अद्ययावत मोबाईल हँडसेट नाहीत. अशा अडचणीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान होते. त्यामुळे शाळा सुरू व्हाव्यात, अशी अपेक्षा पालकांची आहे; मात्र जिल्हातील बहुतांशी शाळा या निमशहरी भागात आणि पंचक्रोशीस्तरावर आहेत. अनेक गावातील विद्यार्थी अशा शाळामध्ये शिक्षण घेतात. त्यामुळे ज्या गावात शाळा आहे. तो गाव कोरोनामुक्त असला तरी त्या गावाच्या परिसरातील गावात किंवा जे विध्यार्थी ज्या गावातून शाळांमध्ये जाणार आहेत. अशा गावात कोरोनाचा रुग्ण नसावा असा नियम आहे. जेणेकरून मुलांना साथीची लागण होणार नाही; मात्र जिल्ह्यात तशा शाळा नाहीत, त्यामुळे शाळा सुरू करणे हे जिल्हा प्रशासनासमोर आव्हानच आहे. जिल्हातील खासगी शाळा विशेषतः इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील मुले ही खाजगी वाहनांनी किंवा एसटी बसने शाळांमध्ये जातात; मात्र अद्याप एसटीबस सुरू झालेल्या नाहीत.

हेही वाचा: स्पर्धा परीक्षेला राम राम ठोकत शेखरने गाव गाठलं अन् झाला कोट्याधीश

शालेय एसटीबस फेऱ्या सुरू झाल्या तरी एका आसनावर एक मुल बसवल्यास एसटीला ते परवडणारे नाही. खाजगी वाहनातही मुलांना कोंबूनच शाळेत नेले जाते. खाजगी वाहतूक दारांनाही कोरोनाचे नियम पाळणे शक्य नाही. यामुळे मागील वर्षी नोंव्हेबरमध्ये शाळा सुरू झाल्या नाहीत. ज्या शाळा सुरू झाल्या तेथे मुलांची उपस्थिती फारचकमी होती.

"जिल्ह्यातील २४७ आठवी ते बारावीच्या माध्यमिक शाळा असून या शाळा मधील वर्ग सुरू करताना टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा प्रयत्न राहील. याबाबतचा आढावा घेऊन लवकरच निर्णय घेतला जाईल. शाळा सुरू करण्यापूर्वी ग्रामपंचायतीचे ठराव घेतले जाणार आहेत. तसेच शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी पूर्ण केली जाणार आहे. शिक्षकांना लसीचे दोन्ही डोस दिल्यानंतर शिकवण्याची परवानगी दिली जाईल."

- अशोक खडूस, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

loading image