esakal | 26 जुलैपर्यंत करूळ घाटरस्ता वाहतुकीस बंद; प्रशासनाचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

26 जुलैपर्यंत करूळ घाटरस्ता वाहतुकीस बंद; प्रशासनाचा निर्णय

26 जुलैपर्यंत करूळ घाटरस्ता वाहतुकीस बंद; प्रशासनाचा निर्णय

sakal_logo
By
एकनाथ पवार

वैभववाडी : जिल्ह्यात (vaibhav wadi) सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तळेरे-कोल्हापूर (kolhapur) राष्ट्रीय महामार्गावरील (national highway) करूळ घाटरस्ता आज (१२) पहाटे खचला. धोकादायक स्थितीमुळे हा घाटमार्ग प्रशासनाने २६ जुलैपर्यत वाहतुकीस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहनचालकांना आता भुईबावडा, फोंडा आणि आंबोली (amboli) घाटमार्गाचा वापर करावा लागणार आहे.

जिल्हयात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. काल रात्रभर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यानाले दुथडी भरून वाहत आहेत. घाट परिसरात अतिवृष्टी सुरू आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका वैभववाडी तालुक्यातील करूळ घाटरस्त्याला बसला आहे. करूळ तपासणी नाक्यापासुन तीन ते चार किलोमीटर अतंरावर पहाटे हा घाटरस्ता खचला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे हा घाटमार्ग आणखी खचण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे त्यातुन मोठ्या प्रमाणात वाहत आहे. घाटरस्ता खचल्यामुळे या मार्गावरील वाहतुक धोकादायक बनली आहे.

हेही वाचा: Kokan Rain Update - शास्त्री, सोनवी, गडनदीला पूर

दरम्यान ही माहीती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक अतुल जाधव हे पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर तत्काळ तेथून एकेरी वाहतुक सुरू केली आहे. त्यानंतर बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना खचलेल्या ठिकाणी तातडीने बोलावून घेतले आहे. त्यानंतर दुपारपर्यंत या मार्गावरून एकेरी वाहतुक सुरू ठेवण्यात आली होती. त्यानंतर सतत पडणाऱ्या पावसाचा विचार करून तहसिलदार, बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या सयुंक्त चर्चेअंती हा घाटमार्ग सुरू ठेवणे धोकादायक ठरू शकते यावर एकमत झाले. त्यानंतर हा घाटमार्ग वाहतुकीस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे तळेरे –कोल्हापुर या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक आजपासुन २५ जुलैपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रसह कोकणातील वाहनचालकांना ये-जा करण्यासाठी भुईबावडा, फोंडाघाट आणि आंबोली घाटमार्गाचा वापर करावा लागणार आहे.

हेही वाचा: 'ॲपेक्स'च्या मान्यतेचीही CBI चौकशी लावा; आशिष शेलारांची मागणी

तुर्तास दुरूस्ती शक्य नाही

सतत पडत असलेल्या पावसामुळे खचलेल्या करूळ घाटरस्त्यांची दुरूस्ती तुर्तास करणे शक्य होणार नाही. त्यामुळे पावसाचा जोर जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत हा रस्ता खुला होण्याची कोणतीही शक्यता असणार नाही.

loading image