पावसमध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांना बाधा ; तालुक्यात 27 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर

राजेश शेळके
Thursday, 17 September 2020

खबरदारी म्हणून प्रत्येक सार्वजनिक क्षेत्राच्या ठिकाणी असलेल्या कार्यालयात कार्यरत कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. 

रत्नागिरी : तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. काल रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार तालुक्यात 27 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. यापैकी एकाच कुटुंबातील तब्बल सात पॉझिटिव्ह रुग्ण पावस परिसरातील सापडले आहेत. आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून प्रत्येक सार्वजनिक क्षेत्राच्या ठिकाणी असलेल्या कार्यालयात कार्यरत कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. 

हेही वाचा - लाखाचे झाले बारा हजार ; मॅच्युरिटीनंतर मिळाली फक्त निम्मीच रक्कम, कुठे घडली घटना ? 

 

काही दिवसांपूर्वी बाजारपेठेत ही चाचणी करण्यात आली. यानंतर महावितरण तर काल पालिकेच्या कर्मचार्‍यांची चाचणी करण्यात आली. पालिकेचे 107 कर्मचार्‍यांचे अहवाल निगेटिव्ह आले. शिवाजी नगर परिसरातील एका बँकेच्या झोनल ऑफिसमधील कर्मचार्‍यांची सुद्धा चाचणी करण्यात आली. यात 3 कर्मचारी पॉझिटिव्ह सापडले आहेत. याशिवाय तालुक्यात सापडलेल्या 27 नव्या रुग्णांमध्ये पावस परिसरात तब्बल 7 बाधित रुग्ण सापडले. 

हेही वाचा - तरीही त्या कोरोना रुग्णांना भेटतात आणि दिलासा देतात ; कोकणात अशाही एक कोरोना योद्धा 

 

दोन दिवसांपासून या परिसरात कोरोनाचा फैलाव सुरू आहे. सापडलेले सातही रुग्ण एकाच कुटुंबातील असल्याचे समजते. याशिवाय जे. के. फाईल्स येथे 1 पोलिस कर्मचारी, खडपे वठार 1, मारुती मंदिर 1, वाटद खंडाळा 2, गावडेआंबेरे 1, नाचणे 2, कर्ला 1,  कुवारबाव 1, गयाळवाडी 2, पठाणवाडी 1, अभ्युदय नगर 1, पेठकिल्ला 1, जेलरोड 1 आणि जुवे येथे एक रुग्ण सापडला आहे. प्रशासनाने मात्र नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आणि विनाकारण शहरात न फिरण्याचे आवाहल केले आहे. 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 27 new corona patients are found in ratnagiri out of that 7 people in one family positive