esakal | रत्नागिरीकरांची चिंता वाढणार; कोरोना रूग्णांची संख्या वाढण्याची शक्‍यता 
sakal

बोलून बातमी शोधा

37 positive patients in four days at ratnagiri

पहिल्याच दिवशी 75 जणांची तपासणी करण्यात आली.

रत्नागिरीकरांची चिंता वाढणार; कोरोना रूग्णांची संख्या वाढण्याची शक्‍यता 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - शहरातील मुख्य बाजारपेठेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. चार दिवसात 37 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असताना पाचव्या दिवशी नव्याने 8 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे पाच दिवसात बाजारपेठेत 45 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने बाजारपेठेची चिंता वाढली आहे. त्यात व्यापाऱ्यांनी बंदला विरोध केल्याने ही संख्या आणखी वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

शहरातील मुख्य बाजारपेठेतील एकाच कुटुंबातील अनेकजण कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे सर्व व्यापारी, कामगारांची तपासणी करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार पहिल्याच दिवशी 75 जणांची तपासणी करण्यात आली. यातून बाजारपेठेत तब्बल 9 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. दुसऱ्या दिवशी 31 जणांपैकी 8, तिसऱ्या दिवशी 60 पैकी तब्बल 12 तर 6 सप्टेंबरला 60 तपासण्या करण्यात आल्या. यातील 8 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. चार दिवसात 226 जणांची तपासणी करण्यात आली  असून, यातील 37 जण पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर पाचव्या दिवसात 43 जणांची तपासणी करण्यात आली. यात आठ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामुळे बाजारपेठेत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 45 झाली आहे.

हे पण वाचा मिनी लवासाला पुन्हा यायचे नाही म्हणत विझल्या तीन दगडांच्या चुली

जिल्ह्यातील प्रमुख शहरातील बाजारपेठ कोरोनाची चैन तोडण्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असताना रत्नागिरीत व्यापाऱ्यांनी मात्र बाजारपेठ बंद न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या नियंत्रणात न ठेवता ती वाढण्याची चिंता अधिक आहे. 

हे पण वाचा - बापरे कधी सुधारणार हे? क्वारंटाईन असूनही गिरणीत काम 

संपादन - धनाजी सुर्वे 

loading image