
पावस: रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे येथील श्री विश्वेश्वर मंदिरात भक्त गण दर्शनाचा लाभ घेतात. रत्नागिरी शहरापासून २२ किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य परिसरामध्ये हे मंदिर उभे आहे. श्रावणात दर सोमवारी उपवास करत सर्वच भक्त शंकराच्या देवळामध्ये दर्शनासाठी हजेरी लावतात. गावडेआंबेरे येथे शंकराचे पुरातन मंदिर आहे.