वेंगुर्ले आगारातून 64 एसटी फेऱ्या सुरू 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 September 2020

जिल्ह्याबाहेरील वाहतुकीसाठी वेंगुर्लेहून सध्या सकाळी 6.30 वाजता रत्नागिरी, 7 वाजता अक्कलकोट, 8 वाजता पुणे, 8.35, 11 आणि दुपारी 2 वाजता कोल्हापूर अशा फेऱ्या सुरु केल्या आहेत. शासनाने राज्याच्या सीमा खुल्या केल्यामुळे आगारातून सकाळी 6 वाजता वास्को व परत 9.30 वास्को ते वेंगुर्ले अशी बस सुरु केली आहे.

वेंगुर्ले ( सिंधुदुर्ग ) - राज्य परिवहन येथील आगारातून ग्रामीण जनतेच्या सोयीसाठी रेडी-कनयाळ, केळूस, निवती, अणसूर-पाल, तुळस, होडावडे, वेतोरे, खानोली, दाभोली मार्गावर सकाळ, संध्याकाळ अशा एकूण 64 फेऱ्या सुरु केल्या आहेत, अशी माहिती आगाराचे आगारप्रमुख जी. एस. चव्हाण यांनी दिली. 

जिल्ह्याबाहेरील वाहतुकीसाठी वेंगुर्लेहून सध्या सकाळी 6.30 वाजता रत्नागिरी, 7 वाजता अक्कलकोट, 8 वाजता पुणे, 8.35, 11 आणि दुपारी 2 वाजता कोल्हापूर अशा फेऱ्या सुरु केल्या आहेत. शासनाने राज्याच्या सीमा खुल्या केल्यामुळे आगारातून सकाळी 6 वाजता वास्को व परत 9.30 वास्को ते वेंगुर्ले अशी बस सुरु केली आहे. पणजी-गोवा परिसरात जाणाऱ्या-येणाऱ्या जनतेला सोयीस्कर म्हणून ही बसची वाहतुक उद्यापासून (ता. 28) सुरू करण्यात येत आहे.

शासनाच्या कोविड-19 नियमावलीच्या अधिन राहून ही वाहतूक करण्यात येणार आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे राज्य परिवहन गाड्यातून पूर्ण क्षमतेने 100 टक्के प्रवाशी वाहतूक चालू केली आहे. पूर्वीप्रमाणेच मासिक पास सवलत, ज्येष्ठ नागरीक सवलत, दूर्धर आजार सवलती, संगणक कोर्स, टायपिंगसाठी 66 टक्के सवलत पूर्वीप्रमाणेच सर्व सवलती व पास देण्याची कार्यवाही चालू केलेली आहे. तरी जनतेने या सर्व गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगारप्रमुख चव्हाण केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 64 ST Rounds Start From Vengurle Depot