चिपळुणात कोरोनाच्या खबरदारीसाठी 69 पथके तैनात..

69 health centers were deployed in 9 primary health centers in ratnagiri kokan marathi news
69 health centers were deployed in 9 primary health centers in ratnagiri kokan marathi news
Updated on

चिपळूण (रत्नागिरी) : कोरोनाबाबत देशासह राज्यभरात दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मोठे मेळावे आणि मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांवरही खबरदारीचा उपाय म्हणून निर्बंध घालण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर तालुक्‍यात खबरदारीचा उपाय व जनजागृतीसाठी तालुक्‍यातील 9 प्राथमिक आरोग्य केंद्रात 69 आरोग्यपथके तैनात केली आहेत. कामथे उपजिल्हा रूग्णालयात कोरोना प्रतिबंध व नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. 

जिल्ह्यात कोरोना फैलाव होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी प्रत्येक तालुक्‍यातील आरोग्य विभागास कडक सूचना दिल्या आहेत. तालुक्‍यात कामथे येथे उपजिल्हा रुग्णालय असून तिथे ग्रामीण भागातील सामान्य रुग्ण उपचार घेतात. उपचारासाठी रुग्णालयात थोडी फार यंत्रणा उपलब्ध आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत हे रुग्णालय असल्याने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर येथे कोरोना प्रतिबंधक व नियंत्रक कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

कामथे रुग्णालयात स्वतंत्र कक्ष.. ​

या कक्षात चार बेड आहेत. जिल्हा आरोग्य विभागाकडून या कक्षासाठी आवश्‍यक असलेला औषध पुरवठा करण्यात आला आहे. येथे व्हेंटिलेटर मॉनिटर यंत्रणाही उभारण्यात आली आहे. सुदैवाने तालुक्‍यात अद्याप एकही कोरोना संशयित रुग्ण आढळलेला नाही. जिल्हा पातळीवरून विशेष पथके नेमण्यात आली असून ते कळंबणी येथे कार्यरत आहे. यासह पालिकेच्या आरोग्य विभागासही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

चिपळुणात खबरदारी​

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांनी तालुक्‍यातील 9 प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 69 पथके तयार केली आहेत. या पथकांमध्ये आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक, सेविकांचा समावेश आहे. त्यांच्यामार्फत गावपातळीवर सर्व्हेक्षणाचे काम सुरू झाले आहे. याशिवाय ही पथके रुग्णांवर लक्ष ठेवून आहेत. त्याचबरोबर अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रामसेवक हे देखील आपल्या विभागात, शाळेत जनजागृतीचे काम करीत आहेत. 

हेही वाचा-येथे होते दररोज ९ ब्रास वाळूची चोरी ; केला जातो पुरावा नष्ट... ​
कोणीही घाबरून न जाता.. 
कोरोना संशयित रुग्ण आढळल्यास त्यावर तातडीने उपचार होण्यासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात नियमित रुग्णवाहिकेबरोबरच 108 रुग्णवाहिका तैनात आहे. आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून कोणीही घाबरून न जाता काळजी घ्यावी, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांनी केले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com