८० टक्के शाळा सुरु ; पहिल्या दिवशी ५० टक्‍के विद्यार्थ्यांची हजेरी

80 percent scholls opens but only 50 students present in ratnagiri
80 percent scholls opens but only 50 students present in ratnagiri

रत्नागिरी : शाळांचे पाचवी ते आठवीचे वर्ग कालपासून प्रत्यक्ष भरण्यास सुरवात झाली. जिल्ह्यात दोन हजार १७२ पैकी एक हजार ६११ शाळा सुरू झाल्या. ७२ हजार ४०१ पैकी ३४ हजार २६४ विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी हजेरी लावली. शाळा सुरू होण्याचे प्रमाण ८० टक्‍के असून, ५० टक्‍के विद्यार्थी शाळेत दाखल झाले आहेत.

कोरोनाचा जोर ओसरल्याने कालपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून संमतीपत्र अत्यावश्‍यक केले. पहिल्या टप्प्यात नोव्हेंबर २०२० मध्ये नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. त्याला ५० टक्‍केच प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागापेक्षा शहरातील पालकांची विद्यार्थी पाठविण्यास मानसिकता नाही. तीच परिस्थिती पाचवी ते आठवीच्या वर्गांसाठी राहील, असे चित्र आहे.

पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यात दोन हजार १७२ शाळा असून, ७२ हजार ४०१ विद्यार्थी संख्या आहे. मोठ्या पटाच्या शाळा सुरू करण्यात अनेकांना अडचणी निर्माण झाल्या. येत्या काही दिवसांत १०० टक्‍के शाळांमध्ये उपस्थिती असेल. शाळा सुरू करण्यापूर्वी पाच हजार ४२ शिक्षकांनी कोरोना चाचणी पूर्ण केली. त्यात २१ शिक्षक कोरोनाबाधित आढळून आले.

वेळापत्रक निश्‍चित

अधिक पट असल्याने शाळांनी वेळापत्रक निश्‍चित केले आहे. पहिल्या दिवशी मुली, दुसऱ्या दिवशी मुले असे नियोजन केले. अध्यापनाची वेळ ठेवली आहे. शाळांत पाच हजार ३९४ शिक्षक आणि एक हजार २२७ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com