८० व्या वर्षाच्या आजींने ओलांडली पुस्तकांची पन्नाशी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

80 year grandmother continuity in writing in ratnagiri kokan marathi news

स्मिता देवधर यावर्षी पुस्तकांची पन्नाशी ओलांडणार; काही पुस्तकांचा बाल वाङ्‌मय योजनेत समावेश...

८० व्या वर्षाच्या आजींने ओलांडली पुस्तकांची पन्नाशी...

चिपळूण (रत्नागिरी) : आजूबाजूला भोवती असलेल्या माणसांच्या गोष्टी, व्यक्तिरेखा आणि सुखदुःखाच्या अनुभवांची गुंफण करीत वयाच्या ८० व्या वर्षीदेखील स्मिता देवधरांनी त्यांच्या लेखनाला प्रवाही ठेवले आहे. या वर्षी त्या त्यांच्या पुस्तकांची पन्नाशी ओलांडत आहेत. स्मिता देवधर या मूळच्या चिपळूणच्या नसल्या तरी अनेक वर्षांपासून येथेच स्थायिक झाल्या. मुले शाळेत जायला लागली की त्यांना काय करावे, असा प्रश्‍न पडायचा.

परिसरातील नातीगोती, शेजारी आणि माणसाच्या व्यक्तिरेखा त्यांच्यासमोर उभ्या राहत. या अनुभवांना आपण शब्दबद्ध करायचे, हे त्यांनी वयाच्या ३६ व्या वर्षी ठरवले. सुरवातीला त्यांची पहिली दीर्घ कथा लिहिली. वहिनी मासिकात ती प्रसिद्ध झाली. त्यावेळी पुस्तक प्रकाशन म्हणजे अवघड बाब होती. जोपर्यंत तुम्ही प्रकाशात येत नाही तोपर्यत, प्रकाशक तुमच्याकडे येत नाही हा अनुभव अन्य लेखकाप्रमाणे स्मिता देवधरांनी घेतला. 

हेही वाचा- सिंधुदूर्गात सर्जेकोट गावाने आणला नवा पॅटर्न... कसा तो वाचा..

पहिले पुस्तक स्वतः प्रकाशित केले

पहिले पुस्तक त्यांनी स्वतः प्रकाशित केल्यानंतर एका जाणकार प्रकाशकाने त्यांना विचारणा केली. पुस्तकाची विक्री चांगली झाल्याचे पाहून त्यांनी यापुढे तुमची पुस्तके चांगली विकली जातील असे सांगितले. नंतर बुरटे हे प्रकाशक त्यांच्याकडे आले. तुमची भाषा सोपी व संवादी असल्याने पुस्तके प्रकाशित करण्याचे ठरवले, असे त्यांनी सांगितले. मासिकात त्यांच्या कथा वाचून त्याचा वाचकांकडून प्रतिसाद येत गेला. नंतर प्रायश्‍चित्त हा कथासंग्रह आला.

हेही वाचा- रत्नागिरीत राजीनामा देण्यासाठी तिच्यावर टाकला दबाव परंतु ..

काही पुस्तकांचा समावेश बाल वाडःमय योजनेत

त्यानंतर काही प्रकाशकांनी त्यांना व्यक्तिचित्रे लिहिण्यास सांगितले. एपीजे अब्दुल कलाम, कल्पना चावला, विवेकानंद अशा अनेक व्यक्तींची चरित्रे त्यांनी लिहिली. शासनाने त्यांची काही पुस्तके बाल वाडःमय योजनेत समाविष्ट करून घेतली. 
कथा, कांदबरी, व्यक्तीचित्रे, चरित्रे आणि माहितीवर्धक पुस्तकांचे लेखन त्या सातत्याने करतात. पक्ष्याबद्दल कुतूहल, सागराच्या तळाशी, आकाशातील गमती जमती या पुस्तकांच्या सहा आवृत्त्या निघाल्या आहेत. इतर काही पुस्तकांच्या दुसऱ्या आवृत्त्या काढल्या जात आहेत. आता त्यांच्या पुस्तकांची पन्नाशी होत आहे. त्यांची चार पुस्तके सध्या प्रकाशनाच्या 
वाटेवर आहेत. 

हेही वाचा- शेतकऱ्यांचे लढवय्ये पुष्पसेन सावंत यांचे निधन...

एक नजर
 ८० व्या वर्षीही लेखनकामात सातत्य
 सुख - दुःख व व्यक्तिरेखांचा अभ्यास
 कथा, व्यक्तिचित्रे व माहीतीवर्धक लिखाण
 ४०० कुटुंबाच्या समुपदेशनाचे काम 

हेही वाचा- कासव पिल्लांचा `येथे` जन्मसोहळा

आता प्रकाशक सुचवतात विषय
लेखन साधनेसोबत त्यांची सामाजिक सेवा सुरू होती. कोवॅसच्या माध्यमातून त्यांनी ४०० कुटुंबाच्या समुपदेशनाच्या कामात सहभाग नोंदवला. सामाजिक कामातील संवेदनशीलता नव्या जाणिवा टिपत होती व त्यातून नवे लेखन सुरू होते. आता प्रकाशक त्यांच्याकडे विषय सुचवतात व त्यानुसार स्मिता देवधर पुस्तके लिहून देतात.