Tilari Dam : तिलारी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ; दवंडी पिटवून सतर्कतेचा इशारा, किती झालाय साठा?

अति पर्जन्यवृष्टीमुळे तिलारी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.
Tilari Dam Water Level
Tilari Dam Water Levelesakal
Summary

मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळाधार वृष्टीमुळे धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

दोडामार्ग : तालुक्यात झालेल्या अति पर्जन्यवृष्टीमुळे तिलारी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. पाणी पातळी ९४.२८ टक्के भरल्याने अतिरिक्त पाणी आज धरणाच्या सांडव्यावरून पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीत सोडण्यात येणार आहे.

Tilari Dam Water Level
Jaykumar Gore : माणचा आमदार ठरवणारे रामराजे कोण? सवाल करत भाजप आमदाराची शरद पवारांवरही सडकून टीका

त्यामुळे या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा तिलारी पाटबंधारे (Tilari Dam) प्रकल्पच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. नदी, नाले देखील भरून वाहत आहेत. जोर धरलेल्या पावसामुळे तिलारी धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे.

Tilari Dam Water Level
Dapoli Tourism : अरबी समुद्रात वादळसदृश स्थिती; पावसामुळं पर्यटकांचा फसला बेत, दापोलीतील पर्यटक माघारी

मुसळधार पावसामुळे धरणाच्या सभोवताली असलेल्या डोंगरातून मोठ्या प्रमाणात पाणी धरणात जमा होते. मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळाधार वृष्टीमुळे धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. तिलारी धरणाची पूर्ण जलसंचय पाणी पातळी ११३.२० मीटर आहे.

धरणाची सांडवा माथा पातळी १०६.७० मीटर झाल्यास पाण्याचा विसर्ग केला जातो. काल (ता.१) सकाळपर्यंत धरण पाण्याने ९४.२८ टक्के भरले. सुरु असलेल्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने आज धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

Tilari Dam Water Level
Samarjeet Ghatge : 'त्या' चुकाच त्यांना सत्तेवरून खाली खेचतील; समरजित घाटगेंचा हसन मुश्रीफांवर निशाणा

दवंडी पेटवून सतर्कतेचे आवाहन

धरणाच्या सांडव्यावरून पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीत पाणी सोडण्यात आले. खराडी नदीचे पाणी व धरणाचे पाणी तिलारी नदीला मिळत असल्याने या नदीपात्रातील पाण्यात वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या असलेल्या कोनाळकट्टा, घोटगेवाडी, परमे, घोटगे, आवाडे, मणेरी, कुडासे, साटेली-भेडशी या गावांसहीत गोवा राज्यातील पेडणे तालुक्यातील इब्रामपूर-हणखणे, चांदेल, हसापूर.

तसेच कासरवर्णे, वारखंड गावातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी नदीपात्रातून ये-जा करू नये. कपडे धुण्यासाठी नदीपात्रात उतरू नये. पाळीव गुरांना नदीपात्रात सोडू नये. गावांत दवंडी पिटवून सतर्क राहण्याचे आवाहन तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com