esakal | सातबारासाठी पैसे घेणाऱ्या तलाठ्यांची होणार आता चौकशी
sakal

बोलून बातमी शोधा

abdul sattar on konkan tour said for satbara do not take money from farmers in ratnagiri

सरकारी कामासाठी सातबारे हे निःशुल्क फी असताना शेतकऱ्यांकडून सातबारापोटी पैसे गोळा करणाऱ्या तलाठ्याची माहिती घेऊन चौकशी करण्यात यावी

सातबारासाठी पैसे घेणाऱ्या तलाठ्यांची होणार आता चौकशी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लांजा (रत्नागिरी) : गेल्या वर्षी अवेळी झालेल्या पावसाने भात आणि फळबागांचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्याचे आदेश काल महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. तसेच, या खरीप हंगामातील पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची यादी करताना सातबारासाठी पैसे घेणाऱ्या तलाठ्यांची चौकशी करण्याचे आदेश राज्यमंत्री सत्तार यांनी दिले आहेत.

हेही वाचा -  राणेंमुळेच केसरकरांचा उदय ः तेली -

लांजा तहसील कार्यालयाचे सुधारित आणि आकर्षक इमारतीचे अंदाजपत्रक तयार करून तातडीने नव्या इमारतीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश अब्दुल सत्तार यांनी दिले. आमदार राजन साळवी यांच्या खास प्रयत्नाने ब्रिटिशकालीन जुनी इमारत आता नव्या ढंगात पूर्णत्वास जाणार आहे. लांजा, राजापूर दौऱ्यावर असलेल्या राज्यमंत्री यांनी दुपारी बाराला लांजा तहसील कार्यालयात आवर्जून भेट दिली. ६० गुंठ्याहून अधिक असलेल्या या जमिनीत सुधारित इमारत अंदाजपत्रक तयार करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या इमारतीचा प्रस्ताव सादर करण्यात यावा. त्याला तातडीने मंजुरी देण्याचे आश्वासन दिले.

गेल्या वर्षी भात आणि फळबाग नुकसानभरपाई काही शेतकऱ्यांना मिळाली नसल्याचे लक्षात आणून देताना वंचित शेतकरी यांची यादी तयार करून त्यांना तातडीने भरपाई देण्यात यावी, अशा सूचना केल्या. सरकारी कामासाठी सातबारे हे निःशुल्क फी असताना शेतकऱ्यांकडून सातबारापोटी पैसे गोळा करणाऱ्या तलाठ्याची माहिती घेऊन चौकशी करण्यात यावी, अशा सूचना केल्या.

हेही वाचा - रंगभूमीदिनी तरी नाटकाची तिसरी घंटा वाजणार का ? रंगकर्मींचा सवाल -

यावर्षीच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची सरसकट सर्व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याच्या सूचना केल्या. रेशन धान्य दुकानदार तक्रारीबाबत ही चौकशी करण्याचे आणि काही ठिकाणी ऑनलाइन नेट नसल्याने होणारी गैरसोय टाळण्यासाठी सूचना दिल्या. आमदार राजन साळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, तहसीलदार पोपट ओमसे, सभापती लीला घडशी, उपसभापती दीपा दळवी आदी उपस्थित होते.

संपादन - स्नेहल कदम 

loading image