esakal | रंगभूमीदिनी तरी नाटकाची तिसरी घंटा वाजणार का ? रंगकर्मींचा सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

question of actors for the marathi rangbhumi din theatres opens or not in ratnagiri

रंगभूमी दिनापासुन रंगमंच उजळेल का ? असा सवाल आज उपस्थित केला जात आहे.

रंगभूमीदिनी तरी नाटकाची तिसरी घंटा वाजणार का ? रंगकर्मींचा सवाल

sakal_logo
By
प्रमोद हर्डीकर

साडवली : पाच नोव्हेंबर हा मराठी रंगभूमी दिन साजरा होणार आहे. गेले आठ महिने रंगभूमीवर एकही प्रयोग झालेला नाही. किमान रंगभूमीदिनी तिसरी घंटा वाजणार का ? असा सवाल रंगकर्मी व रसिक विचारत आहेत. गेल्या आठ महिन्यात रंगभूमीने कोट्यावधीचे नुकसान सोसले आहे. अनेक कलाकार बेरोजगार झाले आहेत. रंगभूमी दिनापासुन रंगमंच उजळेल का ? असा सवाल आज उपस्थित केला जात आहे.

5 नोव्हेंबर 1943 रोजी सांगली येथे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली विष्णुदास भावे यांनी सीतास्वयंवर हे संवाद, संगीत, कथानक यांनी परिपूर्ण असलेले नाटक पहील्यांदाच सादर केले. गावोगावी त्याचे प्रयोग करुन मराठी नाटकांना लोकाश्रय मिळाला. हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणुन साजरा होत असतो. प्रमुख शहरांबरोबरच कोकणातील माणुस हा नाट्यवेडा आहे. अनेक कलाकार कोकणाने रंगभूमीला दिलेले आहेत. मार्च महिन्यापासून कोरोना काळात एकाही नाटकाचा प्रयोग झालेला नाही. 

हेही वाचा - मोबाईलची रेंज झाली गायब ; शिक्षणाचा झाला खेळखंडोबा -

मार्च ते मे महिना या काळात होणारे नाटकाचे असंख्य प्रयोग बंद ठेवावे लागले. ऑक्टोबर पर्यंत लॉकडाउन शिथील होताना नाटकांसाठी मात्र परवानगी दिलेली नाही. यामुळे कलाकार, तंत्रज्ञ, बॅकस्टेज कलाकार यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. थिएटर मालक हतबल झाले आहेत. नाट्यव्यवसायांवर अवलंबुन असणार्‍या कुटुंबांना रोजगारासाठी इतर मार्ग शोधावे लागले आहेत. या व्यवसायावर अनेक घटक उपजिविका करणारे आहेत. 

कोरोनाच्या या महामारीत अनेक कुटुंबांना चांगलीच आर्थिक झळ सोसावी लागली आहे.शासनाने या गोष्टींचा गांर्भिर्याने विचार करणे गरजेचे बनले आहे. मराठी रंगभूमी दिन साजरा होत असताना आता शासनाने रंगभूमीवरील निर्बंध उठवावेत व पुन्हा ते सोनेरी दिवस अनुभवायला द्यावेत अशी मागणी होत आहे.

"रंगभूमी वरील नाट्यप्रयोग सुरु व्हावेत असे कलाकार म्हणुन माझीही मागणी आहे, पण कोरोनामुळे रसिकच नाटकाला नाही आले तर ते कुणालाच परवडणारे नाही. कोरोनामुळे गर्दी कमी करण्यासाठी सीटची मर्यादा येणार व अर्थकारण कमी पडणार हे परवडणारे नाही. पर्यायाने पुन्हा प्रयोग बंद करावे लागतील ही भीती आहे. शासनाने यावर योग्य तोडगा काढावा असे माझे मत आहे."

- अभिनेते वैभव मांगले

हेही वाचा - ना मजुरीचा खर्च, ना मेटनन्सची चिंता ; दोनच तासांत करा साडेतीनशे भात पेंढीची झोडणी -

संपादन - स्नेहल कदम