

Abhay Purohit participating with pride in Pune’s world record ceremony of 1,111 conch blowers.
Sakal
संगमेश्वर: आवड असेल तर सवडही मिळते आणि त्यातून आनंदही घेता येतो. फक्त ती आवड किंवा छंद जोपसण्याची मनामध्ये जिद्द असली पाहिजे. देवरूख खालची आळीतील अभय पुरोहित यांच्याबाबतीत असेच काहीसे म्हणावे लागेल. अभिनय, गायन, वादन अशा विविध कला आज ते वयाच्या साठीनंतरही मोठ्या चिकाटीने जोपासत आहेत. सध्या ते ६९ वर्षांचे आहेत. या वयात त्यांनी गेल्या महिन्यात पुणे येथे झालेल्या विश्वविक्रमी शंखवादन कार्यक्रमात सहभाग घेतला होता.