Ratnagiri Crime : पैशांच्या वादातून मैत्रिणीच्या पोटात सुरा भोसकून केला खून; आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

'पत्नी घरी नसायची तेव्हा शमिका संतोषला भेटायला येत असे'
Ratnagiri Crime News
Ratnagiri Crime Newsesakal
Summary

न्यायालयाने आरोपी संतोष सावंतला दोषी ठरवून जन्मठेप आणि १० हजार रुपये दंड, तो न भरल्यास एका वर्षाची साधी कारावासाची शिक्षा ठोठावली.

रत्नागिरी : पैशांच्या वादातून मैत्रिणीचा धारदार सुरीने खून केल्याप्रकरणी परिस्थितीजन्य पुराव्याआधारे न्यायालयाने शुक्रवारी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. संतोष बबन सावंत (वय ३८, रा. हातखंबा तारवेवाडी, मूळ चिपळूण) असे आरोपीचे नाव आहे.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांनी हा निकाल दिला. ही घटना १० जानेवारी २०१९ या कालावधीत हातखंबा-तारवेवाडी येथे घडली होती. या प्रकरणी आरोपीच्या पत्नीने ग्रामीण पोलिस ठाण्यात माहिती दिली होती. ती व तिचा अपंग पती संतोष हा हातखंबा तारवेवाडी येथील संतोष रामचंद्र आंबवकर यांच्या घरात भाड्याने राहात होते.

Ratnagiri Crime News
मोठी बातमी! साताऱ्यात एक लाखाची लाच घेताना दोन पोलिस अधिकाऱ्यांना अटक; 'अवैध दारू'प्रकरणी केली होती लाचेची मागणी

एका अपघातात संतोषला अपंगत्व आले होते. कुबड्यांच्या आधाराने तो चालतो, मात्र चालक म्हणून तो गाड्यांवर काम करायचा. त्यांची पत्नी घरी नसायची तेव्हा शमिका संतोषला भेटायला येत असे. १० जानेवारीलाही सकाळी नेहमीप्रमाणे संतोषची पत्नी हातखंबा येथील हॉटेलमध्ये कामाला गेली होती.

त्या वेळी संतोषची मैत्रीण ज्योती ऊर्फ शमिका पिलणकर ही त्यांच्या घरी आली होती. दुपारी बाराच्या सुमारास संतोष आणि ज्योती यांच्यात पैशांच्या कारणातून जोरदार वाद झाला. ज्योतीने त्याच्या घरातील सुरा घेऊन संतोषवर चाल केली; मात्र संतोषने तोच सुरा घेऊन ज्योतीला कॉटवर पाडून तिच्या पोटात दोनवेळा भोसकला.

Ratnagiri Crime News
Road Accident : अवघ्या 12 तासांच्या आत आई-मुलाचा दोन वेगवेगळ्या अपघातात दुर्दैवी मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना

यामुळे शमिका रक्ताच्या थारोळ्यात पडली. त्यानंतर संतोष पत्नीला आणण्यासाठी गेला. पत्नी सोनाली घरी आली. घरातील हा प्रकार पाहून तिला धक्काच बसला. घडलेला सर्व प्रकार संतोषने पत्नी सोनालीला सांगितला. तिने ग्रामीण पोलिस ठाण्यात माहिती दिली. माहितीवरून ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्योती ऊर्फ शमिका पिलणकरच्या मृतदेहाचा पंचनामा केली.

Ratnagiri Crime News
Loksabha Election : काँग्रेस कर्नाटकात लोकसभेच्या 'इतक्या' जागा जिंकणार; मुख्यमंत्र्यांनी आकडाच सांगून टाकला

आरोपी संतोष सावंत यांच्याविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी तत्कालीन पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांनी संतोषला अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याचा निकाल शुक्रवारी (ता. ११) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांच्या न्यायालयात झाला.

Ratnagiri Crime News
Bhai Jagtap News : शरद पवारांचं 'ते' वागणं आम्हाला खटकलंच; काँग्रेस आमदाराचा नेमका कोणावर निशाणा?

सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. प्रफुल्ल साळवी यांनी २२ साक्षीदार तपासले. न्यायालयाने आरोपी संतोष सावंतला दोषी ठरवून जन्मठेप आणि १० हजार रुपये दंड, तो न भरल्यास एका वर्षाची साधी कारावासाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस फौजदार सुनील आयरे यांनी काम पाहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com