esakal | कोयना प्रकल्पातून अतिरिक्त वीज निर्मिती
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील कोरोनाचे (Corona) सर्वांत जास्त सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. एकूण सक्रिय रुग्णांच्या २५.६३ टक्के रुग्ण या जिल्ह्यात आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. राज्यात रविवारपर्यंत ३३ हजार ४४९ सक्रिय रुग्णांची नोंद आरोग्य खात्याच्या दफ्तरी झाली होती. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे आठ हजार ५७३ (२५.६४ टक्के) रुग्ण एकट्या पुणे जिल्ह्यात आहेत.

राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण नऊ मार्चला पुण्यात आढळला. तेव्हापासून १० ऑक्टोबरपर्यंत राज्यात ६५ लाख ७७ हजार ८७२ रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी ११ लाख ४७ हजार ८८६ रुग्ण एकट्या पुणे जिल्ह्यातील आहेत. कोरोनाबाधीत झालेल्या या रुग्णांपैकी ११ लाख १९ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, १९ हजार ५०७ रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला. राज्यातील सर्वांत कमी कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या भंडारा येथे आहे, अशी माहितीही देण्यात आली.

हेही वाचा: तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन लहान मुलांसाठी सुसज्ज ‘प्ले रूम’

पुण्यात आरोग्याच्या पायाभूत सुविधा चांगल्या आहेत. त्यामुळे राज्यातील इतर जिल्ह्यांमधून कोरोनाचे रुग्ण उपचारांसाठी पुण्यातील रुग्णालयांमध्ये दाखल होतात. त्यामुळे पुण्यातील रुग्णसंख्या वाढते. पुण्यात तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि अद्ययावत वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज रुग्णालये असल्याने रुग्ण उपचारासाठी पुण्याला प्राधान्य देतात, असे निरीक्षण शहरातील वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले.

हेही वाचा: Corona : राज्यातील संसर्गाचा दर १०.९३ टक्के

राज्यातील कोरोना

- राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर : ९७.३२ टक्के

- सर्वांत जास्त सक्रिय रुग्ण २२ एप्रिल २०२१ (सहा लाख ९९ हजार ८५८)

- सर्वांत कमी सक्रिय रुग्ण ११ फेब्रुवारी २०२१ (३० हजार २६५)

सर्वाधिक सक्रिय रुग्ण असणारे पाच जिल्हे

जिल्हे रुग्णसंख्या

पुणे ८५७३

मुंबई ५९३१

ठाणे ४३४६

नगर ३८१७

सातारा १९६६

loading image
go to top