एसटी संप न मिटल्यास आंदोलन; सावंतवाडीत इशारा

सावंतवाडीत इशारा : परीवहन मंत्र्याना निवेदन
ST
STsakal

सावंतवाडी : एसटीच्या संपामुळे शाळकरी मुले, व्यापारी, दुकानदार , भाजीविक्रेते , प्रवासी यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येत्या चार दिवसात एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास प्रवासी व शाळकरी मुले यांना घेऊन मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्या वतीने मंगेश तळवणेकर यांनी दिला . याबाबतचे निवेदन त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना पाठवले आहे.

श्री तळवणेकर त्यांनी दिलेल्या निवेदनामध्ये अनेक सवाल उपस्थित केले असून त्यामध्ये अंगणवाडी आशा सेविका व पोलीस यंत्रणा यांचा शासन विलीनीकरणाशी संबंध नसताना संबंध दर्शविणे, बस स्क्रपचा घोटाळा किती आहे, जीप खरेदी घोटाळा, डिझेलचा अपकारी कर , बीओटीचे काय झाले, कॉइन बॉक्स घोटाळा काय आहे इतर राज्यात 60 टक्के प्रवासी कर असताना महाराष्ट्रात 17 टक्के प्रवासी कर कसा, प्रत्येक प्रवासी तिकीटा मागे एक रुपया अपघात निधी घेतला जातो तो नेमका कुठे जातो, कामगाराच्या गणवेशासाठी सात कोटी रुपये खर्च नेमका कुठे गेला आदी विविध 32 प्रश्न निवेदनातून परिवहन मंत्री यांना विचारण्यात आले.

असून आपल्या या मागणीसाठी ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या चार दिवसात पूर्ण करून त्यांचे शासकीय सेवेत विलीनीकरण करून घेण्यात यावे. अन्यथा हा आम्ही प्रवासी व शाळकरी मुले यांना घेऊन मोठे आंदोलन उभारू असा इशारा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com