महाराष्ट्र-गोव्याच्या सर्व सीमा खुल्या पण हा एकच नाका आहे बंद

निलेश मोरजकर 
Wednesday, 2 September 2020

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी  यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी बोलण्याचे आश्वासन दिले.

बांदा (सिंधुदुर्ग) :महाराष्ट्र-गोवा राज्यांच्या सीमेवरील सर्व सीमा आज खुल्या करण्यात आल्या. मात्र सातार्डा तपासणी नाका बंद ठेवण्यात आल्याने भारतीय जनता पार्टीचे सावंतवाडी मंडल अध्यक्ष महेश धुरी व युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब, शेखर गावकर यांच्या नेतृत्वाखाली सातार्डा, आरोंदा दशक्रोशीतील २०० हुन अधिक युवकांनी सातार्डा पोलीस नाक्यावर जाऊन जाब विचारला. यामुळे नाक्यावर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. सर्व नाके सुरू असताना या नाक्यावरच प्रवासाची बंदी का? असा सवाल विचारण्यात आला. भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आपण यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी बोलण्याचे आश्वासन दिले.

यावेळी महेश धुरी व जावेद खतीब यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याशी फोन वर चर्चा केली. यावेळी श्री तेली यांनी आपण यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली असून आज सायंकाळी परिपत्रक काढून तपासणी नाका वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल असे आश्वासन दिले.

हेही वाचा- महाराष्ट्रात असंही एक गाव आहे; या गावात कधीच विकला जात नाही चहा

 भारतीय जनता पक्ष बांदा मंडल उपतालुकाध्यष ज्ञानदीप राऊळ, भाजप बांदा मंडल युवक सचिव अजित कवठणकर, भाजप बांदा मंडल युवक कार्यकारिणी सदस्य प्रितेश आरोंदेकर, किनळे उपसरपंच वैभव सोपटे, सामाजिक कार्यकर्ते अरुण केरकर, सागर प्रभू, राजन कवठणकर, शेखर केरकर आणि सातार्डा पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All borders on Maharashtra Goa states open today but Satarda checkpoint closed More than 200 young people hyper