esakal | पडवेतील अमितने फुलशेती करुन मिळवली उत्पन्नाची शाश्‍वती
sakal

बोलून बातमी शोधा

पडवेतील अमितने फुलशेती करुन मिळवली उत्पन्नाची शाश्‍वती

'मेडीकल लॅबोरेटरी टेक्निशियन' असलेल्या अमितचे हात गेली काही वर्ष व्यवसायिक दृष्टीकोनातून शेतीची मशागत करण्यामध्ये गुंतले आहेत.

पडवेतील अमितने फुलशेती करुन मिळवली उत्पन्नाची शाश्‍वती

sakal_logo
By
राजेंद्र बाईत - सकाळ वृत्तसेवा

राजापूर (रत्नागिरी): तालुक्यातील पडवे येथील अमित वसंत अवसरे या युवकाने आधुनिक शेतीची कास धरताना सोनचाफा, लीली आदींची फुलशेती केली आहे. त्यासह अगरबत्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्‍या कांड्या तयार करण्यासाठी वापरायच्या बांबूच्या एक हजार रोपांची लागवड केली आहे. 'मेडीकल लॅबोरेटरी टेक्निशियन' असलेल्या अमितचे हात गेली काही वर्ष व्यवसायिक दृष्टीकोनातून शेतीची मशागत करण्यामध्ये गुंतले आहेत. शाश्‍वत उत्पन्नासाठी आधुनिक शेतीचा निवडलेला वेगळा मार्ग निश्‍चितच इतरांसाठी प्रेरणादायी आहे.

हेही वाचा: राजापूर: एस.टी. कर्मचाऱ्यावर उदरनिर्वाहासाठी भाजी विकण्याची वेळ

अमित गेली काही वर्ष राजापूर शहरामध्ये लॅब चालवित होते. त्यामध्ये व्यवसायिकदृष्ट्या चांगले बस्तान बसविलेले असताना त्यांनी ते क्षेत्र सोडून शेतीची कास धरली आहे. गोवळ येथील बंड्या शेवडे यांच्याकडून लीलीचे सुमारे १७०० कांदे घेवून त्याची सुमारे बारा गुंठ्यामध्ये लागवड केली आहे. त्यामध्ये आंतरपीक म्हणून सौंदर्य प्रजातीच्या सोनचाफ्याची लागवड केली आहे. रोपांना पाणी देताना त्याची मशागत करण्याचेही त्यांनी योग्य नियोजन केले आहे.

हेही वाचा: राजापूर येथील विलगीकरणातील पॉझिटिव्ह रुग्ण गेला कुडाळला 

सुमारे पंचवीस महिलांना वर्षभर रोजगार मिळवून देत कॅश्यू प्रोसेसिंग युनिट चालविणारे अमित यांनी भविष्यामध्ये अगरबत्ती काड्या तयार करणे, परफ्युम तयार करण्याचे व्यवसाय उभारण्याचा मानस ठेवला आहे. आजपर्यंतच्या प्रवासामध्ये वडील वसंत अवसरे, चुलते बाबू अवसरे, विलास अवसरे, बाळ तांबे, पेंडखळे येथील प्रफुल्ल सुर्वे, पी.एम. ढवळे इलेक्ट्रीकल्स आदींचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा: राजापूर तालुक्यातील जानशी, बाकाळे परिसरात ब्लॅक पॅंथरचा वावर ? 

स्थानिक बाजारपेठ शोधली

'लीलीच्या फुलांच्या विक्रीसाठी अमित यांनी स्थानिक पातळीवर मार्केट शोधले असून कणकवली (जि.सिंधुदूर्ग) येथील विक्रेत्यांना फुलांची विक्री करतात. त्यांना एस.टी.द्वारे दैनंदीन फुले उपलब्ध करून देतात. त्यासाठी रोज पडवे येथून राजापूर वा हातिवले येथे येथे ये-जा करतात. जून महिन्यापासून फुलांची तोड सुरू झाली असून आजपर्यंत सुमारे शंभरहून अधिक किलो फुलांची विक्री झाल्याची माहिती त्यांनी दिली. त्यासाठी प्रतिकिलो सत्तर ते शंभर रूपये दर मिळाला. त्यांनी अद्यापही सोनचाफ्याच्या फुलांची तोड सुरू केलेली नाही.

हेही वाचा: राजापूर ग्रामीण रूग्णालयात लसीकरण केंद्राला शुभारंभ; यांना लसीकरणापासून येणार वगळण्यात 

बांबूची रुजवात घरीच केली

अमित यांनी बांबूची लागवड केली आहे. त्यासाठी आवश्यक असलेले बियाणे 'अ‍ॅमेझॉन'वरून ऑनलाईन मागविले. त्याची रूजवात घरीच केली असून त्यातून रूजलेल्या एक हजार बांबूच्या रोपांची घराशेजारील जागेमध्ये लागवड केली आहे.

हेही वाचा: राजापूर ग्रामीण रूग्णालयात लसीकरण केंद्राला शुभारंभ; यांना लसीकरणापासून येणार वगळण्यात 

एक नजर...

-लीलीचे १७०० कांदे लावत सुरवात

- बारा गुंठ्यामध्ये फुलवतोय फुले

- आंतरपीक म्हणून सोनचाफ्याची लागवड

- बांबूच्या एक हजार रोपांची लागवड

loading image