esakal | बहारीनमधून अमोल पोहचणार कोकणात ; परराष्ट्र मंत्रालयाचा हिरवा कंदील
sakal

बोलून बातमी शोधा

Amol will come to Konkan from Bahrain

दापोली तालुक्यातील लोणवडी येथून 4 महिन्यांपूर्वी एक युवक बहारीन या देशात नोकरीसाठी गेला होता तो तेथेच अडकला... 

बहारीनमधून अमोल पोहचणार कोकणात ; परराष्ट्र मंत्रालयाचा हिरवा कंदील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दाभोळ (रत्नागिरी) : दापोली तालुक्यातील लोणवडी येथून 4 महिन्यांपूर्वी एक युवक बहारीन या देशात नोकरीसाठी गेला होता तो तेथेच अडकला असून त्याला भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्यासाठी परराष्ट्र मंत्रालयानेही हिरवा कंदील दाखवला आहे.


 लोणवडी येथील अमोल कोळंबेकर याला बहारीन येथून भारतात परत आणण्यासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष मकरंद म्हादलेकर यांनी परराष्ट्र राज्यमंत्री यांना 7 मे रोजी इमेल द्वारे विनंती केली होती. या मेलची दखल घेण्यात आली असून आज म्हादलेकर याना त्यासंदर्भात कळविण्यात आले असून बहारीन येथील दूतावासात यासाठी वेगळा कक्ष निर्माण करण्यात आला असून तेथे भारतीयांना परत नेण्यासाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा- Video : महाराष्ट्र सरकारला धन्यवाद देत,ते राजस्थानी पर्यटक गेले आपल्या गावी....

 अमोल कोळंबेकर उद्याच दूतावासात जाऊन नोंदणी करणार आहेत. देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने केवळ दोन दिवसातच मेलला प्रतिसाद देऊन विदेशातील भारतीयांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याने परराष्ट्र मंत्रालयाचे आभार मानले आहेत.