युवकांमध्ये मदतानाबाबतची उदासीनता चिंताजनक : श्रीकांत देशपांडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युवकांमध्ये मदतानाबाबतची उदासीनता चिंताजनक : श्रीकांत देशपांडे

युवकांमध्ये मदतानाबाबतची उदासीनता चिंताजनक : श्रीकांत देशपांडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी ः राज्याच्या आढाव्यामध्ये ४ लाख दुबार मतदार असल्याचे पुढे आले. त्याची बीएलओमार्फत तपासणी करून त्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली. तरी अजून १३ हजार दुबार मतदार आहेत. चिंतेची बाब ही आहे की, १८ ते २९ वयोगटातील तरुणांची मतदार यादीतील संख्या साडेतीन टक्के अपेक्षित आहे, ती फक्त सव्वा टक्केच आहे तर १९ ते २९ वयोगटातील तरुणांचा मतदार यादीमध्ये १८ टक्के समावेश हवा तो १३ टक्केच आहे. लोकशाहीच्या पहिल्या पायरीबाबत युवक वर्ग उदासीन असल्याची बाब गंभीर असून त्यांना या प्रवाहामध्ये आणण्याची गरज आहे, अशी चिंता प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केली.

राज्यात मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम राबवला जात आहे. त्या निमित्ताने जिल्हानिहाय त्यांचे दौरे सुरू आहेत. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

ते म्हणाले, मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रमाची निरंतर प्रक्रिया आहे. १ जानेवारी २०२२ ला १८ वर्षे पूर्ण करणाऱ्यांना या यादीमध्ये नावनोंदणी करता येणार आहे. प्रारुप यादी १ नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. १ ते ३० नोव्हेंबरपर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत. यासाठी विशेष मोहीम १३ ते १४ आणि २७ ते २८ नोव्हेंबर या दरम्यान राबवण्यात येणार आहे तसेच १६ नोव्हेंबरला प्रत्येक विशेष ग्रामसभांचा कार्यक्रम राबवून मतदार यादीचे चावडी वाचन होणार आहेत. त्यानंतर मतदारांनी नवीन नोंदणी, छायाचित्राचा समावेश, नावामध्ये बदल किंवा चुक झाल्यास ती दुरुस्ती मतदारांनी करून घ्यावी.

हेही वाचा: मि. ५६ इंच घाबरलेत! चीनबाबत परस्परविरोधी दाव्यांवरून राहुल गांधींची टीका

राज्यात अजूनही २८ लाख मतदार ओळखपत्र अशी आहेत की, त्यांच्यावर मतदाराचे छायाचित्र नाही. त्यामुळे आम्ही यंत्रणा कामाला लावून १ लाख ८५ हजार छायाचित्रे गोळा केली. १८ लाख पत्त्यावर नोटीस पाठविण्यात आली. ही १८ लाख नावे कमी करण्यात आली. ९ लाख मतदार असे आहेत की, त्यांच्या मतदान ओळखपत्रावर अजून छायाचित्र नाही. त्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. मतदार यादीतील आपल्या नावाची खात्री करण्यासाठी वोटर हेल्पलाइन अॅप डाउनलोड करा आणि त्यावर आपल्या नावाची खात्री करा.

४ लाखापैकी ६९ हजार दिव्यांगांच यादीत

दिव्यांग मतदारांसाठी या वेळी पोस्टल बॅलेटची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना घरबसल्या मतदान करता येणार आहे; मात्र ज्यांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करायचे आहे त्यांच्यासाठी व्हील चेअरपासून अन्य सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. राज्यात ४ लाख दिव्यांग आहेत; मात्र मतदार यादीमध्ये फक्त ६९ हजार जणांची नोंद आहे. त्यामुळे दिव्यांगांची मतदार यादीमध्ये नोंद करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती देशपांडे यांनी दिली.

loading image
go to top