
संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर येथून ३ किलोमीटर अंतरावरील कसबा गावामध्ये कर्णेश्वर हे एक सुंदर असे शिवालय आहे. सुमारे ४०० चौरस मीटरच्या फरसबंद आवारात ते मंदिर उभे आहे. मुख्य प्रवेशद्वार पूर्वेला आहे, तर दक्षिण आणि उत्तर या दोन्ही बाजूंकडून मंदिरात प्रवेश कर्णेश्वर मंदिर ५ फूट उंचीच्या जोत्यावर उभे असून त्याला या जोत्यारूनच प्रदक्षिणा मार्ग सुद्धा केलेला आहे. पूर्वेच्या बाजूने मंदिरात प्रवेश करताना मुखमंडपाच्या पायऱ्यांच्या दोन बाजूंना देवकोष्ठे आहेत.