स्वतःच्या मनातील भीतीला कसे घाबरवाल? 'हे' उपाय ठरु शकतात उपयुक्त

भीतीही कधी कधी क्षणाची सोबती तर काहींच्या पूर्ण आयुष्याला वेढून टाकणारी एक दुःखद बाब असते.
Businessman and Life
Businessman and Lifeesakal
Summary

आत्मविश्वास हेच भीतीवरील प्रभावी औषध होय. आपला स्वतःवरील विश्वास, स्वतःच्या विचार आणि स्वतःच्या आचरणावरील विश्वास म्हणजे आत्मविश्वास.

-प्रसाद अरविंद जोग theworldneedit@gmail.com

निडर वृत्ती, स्वाभिमानी बाणा, सुस्पष्ट विचार, सुयोग्य कर्तृत्व व प्रचंड आत्मविश्वास असेल तर भीतीचा बागुलबुवा क्षणात उतरवता येतो; पण त्यासाठी निर्भय, विवेकी व सकारात्मक मनाची साथ उद्योजकाला (Businessman) असावीच लागते. नकारात्मक विचार (Negative Thoughts), नकारात्मक भावना, चुकीच्या धारणा, कळत-नकळतपणे लहानपणी मनावर झालेले चुकीचे संस्कार, अयोग्य जाणिवा, मानसिक कमकुवतपणा, मनाचा कोतेपणा, मनाला दु:खी राहण्याची लागलेली सवय, काहीतरी गमावून बसण्याची भावना, अज्ञान, आत्मविश्वासाचा अभाव यामुळे मनात खोलवर भीती जन्माला येते व उद्योजकांचे आयुष्य पूर्णपणे भयग्रस्त बनवून टाकते.

भीती नुसती घाबरवत नाही तर ती व्यक्तीला अकर्मक, निष्क्रिय व अचेतन बनवते. भीती म्हणजे व्यक्तिमत्त्व विकासातील महत्त्वाचा अडसर होय. जो डर गया वो मर गया, असे हिंदीत म्हणतात आणि ते तंतोतंत खरेही आहे. भीती वाळवीप्रमाणे व्यक्तीचे व्यक्तिगत आयुष्य अथवा उद्योजकांचे उद्योजकीय आयुष्य उद्ध्वस्त करून टाकू शकते.

Businessman and Life
Childrens Health : मुलांनी खोटं बोलणं टाळावं यासाठी काय करावं?

भीती, ताणतणाव, भयगंड, न्यूनगंड, अनाकलनीय भीती, अवास्तव भीती, काल्पनिक भीती, मानसिक वैफल्य, चिंता मनाला व मनाच्या मालकाला व्याधीग्रस्त बनवत असतात. यावर एकच उपाय असतो तो म्हणजे मानसिकता (Mentality) बदलाचा. मानसिकता बदल हा अत्यंत गरजेचा आहे. यामुळेच भीतीची तीव्रता कमी होऊ शकते. मानसिकता म्हणजे आपण एखादे कार्य क्षमतेने पूर्णत्वास नेऊ शकतो, ही धारणा व त्यासाठी लागणारा आत्मविश्वास, ऊर्जा आपल्यामध्ये आहे हे मनाने स्वीकारण्याची तयारी दाखवणे होय.

मोठ्या स्पर्धांसाठी विशिष्ट जबाबदारी स्वीकारण्यासाठी सर्वात प्रथम मनाला तयार करावे लागते. कारण, उत्तम मन:स्थिती कोणतीही परिस्थिती स्वीकारायला व बदलायला त्या व्यक्तीला तयार करत असते. उद्योजकीय मानसिकता हीसुद्धा उद्योजकाच्या विचारसरणीवर व उद्योजकीय मनाच्या सकारात्मक धारणांवर, विचारांवर अधिक बळकट व सक्षम होत असते; पण याउलट स्वतः उद्योजक जर आपल्या उद्योजकीय प्रवासाबद्दल साशंक असेल तर त्याच्या उद्योजकीय मानसिकतेला भीतीचे ग्रहण लागायला सुरुवात होते.

माणूस म्हणून उद्योजक म्हणून तुम्ही कसा विचार करता? तुमच्या कमतरता ओळखून त्यावर काम करायला कशा पद्धतीने तयार होता? किंवा तुमचा आत्मविश्वास प्रत्येक वेळी तुमच्याबरोबर ठेवण्यात किती यशस्वी होता यावर भीती तुम्हाला घाबरवणार का तुम्ही भीतीला? हे ठरत असते. चिंता ही मनुष्य देहाला चितेवर जाईपर्यंत पोखरत राहते. चिंता, भय यामुळे माणसाचा आत्मविश्वास कमी होतो. मनुष्य प्रत्येक गोष्टीतून पळ काढायला लागतो. जबाबदारी टाळायला लागतो. कारण मानगुटीवर बसलेली भीती. कधी कधी या दोन अक्षरी शब्दाची गंमत वाटते, कारण हा दोन अक्षरी शब्द माणसाचा सतत पाठलाग करून त्याला हैराण करून टाकत असतो.

Businessman and Life
Infertility Symptoms : जोडप्यांमधील सगळ्यात मोठी समस्या म्हणजे वंध्यत्व; कोणती आहेत कारणे?

दैनंदिन जीवनात कुणाला पाण्याची भीती वाटते, कुणाला अंधाराची तर कुणाला चारचौघात बोलण्याची, कुणाला माणसांची तर कुणाल विविध आजारांची भीती वाटते. परीक्षेची, मांजराची, कुत्र्याची, विद्युत उपकरणे हाताळायची, नाही म्हणण्याची, मुलाखतीची भीती अशी मोठी यादी सर्वसामान्यांच्या बाबतीत तयार होऊ शकते. अशीच भीती उद्योजकाच्या मनातही तयार होत असते. याच भीतीचे विविध प्रकार कमजोर आत्मविश्वास असलेल्या उद्योजकातही दिसून येत असतात. नवीन उद्योग सुरू करून चाचपडत असणाऱ्या उद्योजकातही भीतीची लक्षणे पाहायला मिळतात.

उद्योजक म्हणून त्यांना कोणत्या ना कोणत्या अनामिक भीतीची दहशत असतेच असते. कुणाला चारचौघात बोलण्याची भीती वाटते, तर कुणाला माणसांची भीती वाटते, कुणाला दुकानात उभे राहून गिऱ्हाईकांशी बोलायची, कुणाला कर्ज घ्यायची, कुणाला मंदीची, कुणाला हिशोब चुकणार तर नाही ना याची भीती वाटते तर कुणाला इंग्रजी बोलण्याची भीती वाटते, तर कुणाला बँकांच्या व्यवहारांची भीती वाटते, कुणाला आपल्या उद्योग व्यवसायाचा विस्तार करण्याची भीती वाटते, कुणाला बाजारातल्या तीव्र स्पर्धेची भीती वाटते तर कुणाला आपल्याला धंदा, उद्योग चांगल्यातऱ्हेने जमत नाहीये व आपण अपयशी ठरत आहोत याची सारखी भीती वाटत राहते.

Businessman and Life
दिनकरसारखी कोकणातली माणसं, मुंगी होऊन साखर खाणारी अन् त्या साखरेचा गोडवा इतरांना वाटणारी!

भीतीही कधी कधी क्षणाची सोबती तर काहींच्या पूर्ण आयुष्याला वेढून टाकणारी एक दुःखद बाब असते. भीती ही भावना असते, भीती विचारांचा गुंता असतो, भीती म्हणजे कल्पनेचा खेळ असतो. नकारात्मकतेचे, घाबरटपणाचे लक्षण असते भीती. भित्र्या मनाला नकारात्मकतेमुळे सारेच भीतीदायक वाटत असते. काही भीतींच्या प्रकारामागे ठोस कारणे असतात. ते विशिष्ट कारण संपले की भीतीही भीती राहत नाही, अशा प्रकारच्या भीतीदायक भावना मनुष्य क्षणात विसरून जातो तर काही भीतींचे प्रकार काल्पनिक व मनोवैज्ञानिक असू शकतात.

प्रत्येकाच्या मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात कशाची ना कशाची तरी भीती असतेच आणि हे अगदी नैसर्गिक आहे. पण या स्पर्धात्मक युगात टिकून राहायचे असेल तर आपण भीतीवर मात करायला निश्चितपणे शिकले पाहिजे. अस्वस्थता, बेचैनी आणि भीती अशी वेगवेगळी कारण वेगवेगळ्या रूपाने माणसाला मागे खेचत असतात. भीती नेहमीच प्रगतीला मारक ठरत असते. यात अडकलेल्या व्यक्तीला आपली पात्रता असून देखील स्वतःला सिद्ध करता येत नाही. सहज कुठेही जाऊन स्वतःच आयुष्याचा आनंद घ्यावा म्हटलं तर तोही घेता येत नाही कारण, मनात भीती असते. म्हणतात ना भीत्या पाठीमागे ब्रह्मराक्षस.

आत्मविश्वास हेच भीतीवरील प्रभावी औषध होय. आपला स्वतःवरील विश्वास, स्वतःच्या विचार आणि स्वतःच्या आचरणावरील विश्वास म्हणजे आत्मविश्वास. जेव्हा व्यक्तीची स्व संकल्पना ही सकारात्मक व वास्तवावर आधारित असते तेव्हा कोणतीही भीती त्या व्यक्तीला अधिकच घाबरू लागते. आत्मविश्वासाने आपल्या विचारात, बोलण्यात, वागण्यात ठामपणा येतो. विचार, आचार सकारात्मक होतात आणि इतरांशी ठामपणे वागताना आणि संवाद साधताना आपण सहज आणि प्रत्यक्ष संवाद साधू शकतो. आत्मविश्वासाने घाबरटपणा निघून जातो, असाध्य रोग बरे होतात. नसत्या चिंता, शंका कुशंका मनामध्ये येऊन मनाला भयभीत करू शकत नाहीत. भीती तुमच्या या आश्वासक व जोखीम स्वीकारण्याच्या दृष्टिकोनाला पाहून कोसो अंतर दूर पळते.

Businessman and Life
Yakub Baba Dargah : 'या' भागात शिवरायांचे गुरू म्हणून याकुबबाबा का आहेत प्रसिद्ध? जाणून घ्या घुमट नसलेल्या दर्ग्याची दंतकथा

भीती घालवण्याचा सहज सोपा मंत्र म्हणजे मनाला सांगणे अरे, मना मी कशालाच भीत नाही. मी भीतीला सामोरे जायला तयार आहे. माझ्या अंगी सामर्थ्य आहे. मी येईल त्या परिस्थितीला धैर्याने आणि निश्चयाने तोंड देऊ शकतो. भीती घालवण्यासाठी अथवा कमी करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे आत्म परीक्षण करावे लागते व ठरवावे लागते की आपण कशाकशाला व किती प्रमाणात घाबरतो; आपणाला वाटणारी भीती ही क्षणिक, तात्पुरती आहे का? सातत्याने वाटणारी दीर्घकालीन आहे. भीती मागची कारणे काय असू शकतात हे लिहून काढल्यावर त्यातून बाहेर पडण्याचे पर्यायी उपाय काय काय असू शकतात याचाही अभ्यास करण्याची गरज असते. चिंता करत बसून भीतीचे निर्मूलन कधीच होऊ शकत नाही तर आत्मपरीक्षण व आत्मविश्वासाच्या बळावर आपण भयमुक्त होऊ शकतो आणि म्हणूनच उद्योजकीय मानसिकता घडवत असताना आत्मनिर्भर होण्यासाठी उद्योजकाने स्वयंप्रेरणेने स्वतःला दिलेल्या सकारात्मक सूचना भीतीला घाबरवायला उपयुक्त ठरु शकतात.

(लेखक उद्योग प्रेरणा प्रशिक्षक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com