

Koyna Water to Mumbai Faces Opposition as Shiv Sena Leader Asmita Kendre Warns Government to Protect Konkan Water Rights
sakal
रत्नागिरी : पहिल्यांदा माझ्या कोकणातील जनतेला आणि इथल्या उद्योगांना पाणी पुरू द्या. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांचे हित महत्त्वाचे आहे. आधी कोकण पाण्यासाठी समृद्ध झाले पाहिजे मगच कोयनेचे अवजल मुंबईला देण्याचा निर्णय घ्यावा. कोकणच्या हक्कासाठी वेळप्रसंगी संघर्ष करावा लागला किंवा रस्त्यावर उतरावे लागले तरी उतरू, असा इशारा महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनी घरचा आहेर दिला आहे.