esakal | 'सर्जा'शी जुळले 30 वर्षांचे ऋणानुबंध
sakal

बोलून बातमी शोधा

'सर्जा'शी जुळले 30 वर्षांचे ऋणानुबंध

जीवाच रान करून मालकांसाठी राबत असलेल्या बैलाप्रती या निमित्ताने ऋण व्यक्त केले जातात.

'सर्जा'शी जुळले 30 वर्षांचे ऋणानुबंध

sakal_logo
By
एकनाथ पवार

वैभववाडी : आता दोघांच्याही पायात अवसान राहिले नाही. तरीदेखील दोघेही एकमेकांना भेटण्यासाठी आतुर असतात. निकोप मैत्री, एकमेकांप्रती असलेले प्रचंड प्रेम आणि आपुलकीची भावना यामुळे त्यांच्यातील अतुट नातं ३० वर्षानंतर देखील कायम आहे. अरूळे येथील शंकर कुसाजी खांबल आणि त्यांना वर्षांनुवर्षे साथ देणाऱ्या त्यांच्या लाडक्या ‘सर्जा’ची ही वास्तवदर्शी कहाणी खूप काही सांगून जाते.

हेही वाचा: खरमाटेंचे 750 कोटींचे साम्राज्य पाहणीसाठी सोमय्या सांगलीत

सर्वत्र आज बैलपोळा साजरा केला जातो. जीवाच रान करून मालकांसाठी राबत असलेल्या बैलाप्रती या निमित्ताने ऋण व्यक्त केले जातात. अरूळे सुतारवाडी येथील शंकर खांबल या शेतकऱ्याने वयाची शंभरी पार केली आहे. वयोमानानुसार त्यांच्या शरीरात आता अवसान राहिलेले नाही. ते अक्षरक्षः अंथरूणाला खिळले आहेत. उठता येत नाही आणि बसता देखील येत नाही. त्यांच्याप्रमाणे त्यांचा आवडता बैल ‘सर्जा’ हा देखील आता थकला आहे. चारा चघळताना देखील त्याला त्रास जाणवत आहे. मालक खांबल घरात बेडवर असतात तर ‘सर्जा’ हा गोठ्यात बांधलेला असतो; मात्र या दोघांमध्ये आजही प्रचंड प्रेम आहे.

ऐन उमेदीत दोघांमध्ये असलेले नात आजही ३० वर्षानंतर कायम आहे. जोपर्यंत खांबल यांची प्रकृती चांगली होती, तोपर्यंत ‘सर्जा’ला हव नको ते ते पाहत असत. त्याला अगदी मच्छर देखील चावणार नाहीत, याची दक्षता घेत असत. त्याच्या गोठ्यात धुरीचा वापर करीत असत. एखाद्या दिवशी जर मालकाला ‘सर्जा’ आणि ‘सर्जा’ला मालक दिसला नाही तर दोघांचाही जीव कासावीस होत असे. ज्यावेळी खांबल ‘सर्जा’ला दिसायचे नाहीत, त्यावेळी हंबरून त्यांना जवळ बोलवित असे. शेतीतील नांगरणी, बैलगाडी ओढणे या सर्व कामांसाठी खांबल यांना ‘सर्जा’ने मदत केली.

हेही वाचा: 'मुंबई महापालिकेत कोस्टल रोडच्या नावे १ हजार कोटींचा घोटाळा'

‘सर्जा’नेही प्रत्येक गोष्ट इमाने इतबारे पार पाडली. त्याचप्रमाणे मालक म्हणुन खांबल यांनी देखील ‘सर्जा’ला बैलाप्रमाणे वागणूक दिली नाही. दोघांमध्ये कायम निखळ मैत्रीचे वातावरण राहिले. आता दोघांचेही वय झाले आहे. खांबल हे बेडवरच असतात; परंतु तेथुन ते आपल्या मुलाला, सुनेला बैलाला चारा, पाणी घालण्याचा तगादा लावतात.

मुलगा जगन्नाथ आणि सुन दोघांनाही खांबल यांचे सर्जावरील प्रेम माहीत असल्यामुळे ते ही कोणतीही सबब पुढे न करता त्यांचा शब्द पाळतात. आठवड्यातून उचलून आणून त्यांना बैल दाखवितात. ते देखील बैलाच्या पाठीवरून आपुलकीने हात फिरवितात. मालकाला पाहिल्यानंतर ‘सर्जा’चा चेहरा देखील खुलतो. खांबल आणि ‘सर्जा’ मधील निकोप मैत्री, आपुलकीच नातं आज ३० वर्षांनीही टिकुन आहे.

हेही वाचा: गणपती बप्पा मोरया! कोकणात जाणाऱ्यांना ठाकरे सरकारचं मोठं गिफ्ट

डोळे पाणावले

अंगणात बांधलेल्या सर्जाला पाहण्यासाठी श्री. खांबल यांना बाहेर आणण्यात आले. ‘सर्जा’ला ते भेटले. त्यांच्या बाजुला बराच वेळ बसले. त्यानंतर त्यांना पुन्हा घरात नेण्यात आले. त्यावेळी त्यांचे डोळे अक्षरक्षः पाणावले.

loading image
go to top