
चिपळूण: महायुतीच्या विरोधात प्रखर भूमिका घेणारे आमदार भास्कर जाधव विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या तावडीतून सुटले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांना घेरण्यासाठी महायुतीने तयारी केली आहे. मतदारसंघातील त्यांची पकड संपवण्यासाठी विरोधकांनी फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यात केवळ गुहागरमध्ये महायुती विरुद्ध भास्कर जाधव, असे राजकारण तापले आहे.