esakal | Konkan Rain Update - भुईबावडा, करुळ घाट वाहतूकीसाठी बंद
sakal

बोलून बातमी शोधा

Konkan Rain Update - भुईबावडा, करुळ घाट वाहतूकीसाठी बंद

Konkan Rain Update - भुईबावडा, करुळ घाट वाहतूकीसाठी बंद

sakal_logo
By
विनोद दळवी

ओरोस : गेले १५ दिवसांहुन अधिक कालावधी सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे सिंधूदुर्ग (sindhudurg district) जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अन्य जिल्ह्यातून येणारे अनेक मार्ग बंद झाले आहेत. जिल्ह्यातील महत्वाचे भुईबावडा (bhuibawda) व करुळ घाट बंद झाले आहेत. रत्नागिरी, सिंधूदुर्ग जिल्ह्याला जोडणाऱ्या तिथवली येथील जामदा नदीच्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने येथील वाहतूक थांबवण्यात आली आहे. (konkan rain update)

हेही वाचा: दुपारी 12 चे Update - जिल्ह्यातील कोणते मार्ग बंद; वाचा सविस्तर

गेले पंधरा दिवस जिल्ह्यात सातत्याने पाऊस (heavy rain) पडत आहे. काल दिवसभर पाऊस पडला. सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत पडलेल्या पावसाची ६३.१ ७५ मिमी इतकी नोंद झाली आहे. सर्वाधिक वैभववाडी तालुक्यात १३१ मिमी पाऊस झाला आहे. मात्र, रात्री उशिरा जोरदार पाऊस पुन्हा सुरु झाला. गुरुवारी दुपारपर्यंत सातत्य राहिल्याने जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील नदी, नाले, ओहोळ तुडूंब भरून वाहू लागले आहेत. अनेक घरांना पुराच्या पाण्याने वेढा पडला आहे.

हेही वाचा: अलमट्टी धरणातून 97 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

कुडाळ तालुक्यातील आंबेरी पुलावर पाणी आले आहे. कणकवली तालुक्यातील नाटळ येथील ५ घरांना पुराच्या पाण्याने वेढले आहे. शिरसिंगे गोठवेवाडी येथे डोंगराचा भाग कोसळला आहे. रत्नागिरी व सिंधूदुर्ग या दोन जिल्ह्यांना जोडणारा तिथवलीतील जामदा नदीच्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने येथील वाहतूक थांबविली आहे. शिवगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. फोंडा व आंबोली हे दोनच घाट सध्या वाहतुकीस सुरळीत सुरु आहेत.

loading image