esakal | दुपारी 12 चे Update - जिल्ह्यातील कोणते मार्ग बंद; वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

दुपारी 12 चे Update - जिल्ह्यातील कोणते मार्ग बंद; वाचा सविस्तर

दुपारी 12 चे Update - जिल्ह्यातील कोणते मार्ग बंद; वाचा सविस्तर

sakal_logo
By
लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात (kolhapur district) गेल्या ४८ तासांत सलग मुसळधार पाऊस झाल्यामुळे पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी ३८ फुटांपर्यंत पोचली असून ती इशारा पातळीला (panchagnga river) केवळ दोन फुट कमी आहे. तसेच जिल्ह्यातील ८१ बंधारे पाण्याखाली आहेत. खोची ते सांगली (sangli) जाणारी वाहतूक बंद असून खोची बंधाऱ्यावर पाणी आले आहे. (kolhpaur district road block update) तसेच गगनबावडा मार्गबंद असून शाहूवाडी, राधानगरी भागातील ही अनेक रस्ते वाहतुकीस बंद आहेत. त्याचे अपडेट सकाळच्या माध्यमातून असे -

हेही वाचा: कोल्हापूरचा पाऊस; राधानगरी धरण क्षेत्रांत धुवांधार, सतर्कतेचा इशारा

 • कोल्हापूर - रत्नागिरी मार्ग पूर्ण बंद आहे. जाधववाडी निळे येथे पाणी रस्त्यावर

 • मलकापूर ते कोल्हापूर - हा मार्ग बंद आहे.

 • बर्की गाव पुलावर पाणी आल्यामुळे तेथील संपर्क तुटला आहे

 • मालेवाडी ते सोंडोली येथील पुलावर पाणी आल्यामुळे

 • शित्तूर वारूंन शिराळे वारून उखळू खेडे सोंडोली कडे जाणारा रस्ता बंद आहे.

 • सोष्टवाडी जवळ पाणी आल्यामुळे मलकापूर ते अनुस्कुरा मार्ग बंद

 • कडवी पुलावर पाणी आल्यामुळे मलकापूर ते शिरगाव मार्ग बंद

 • चरण ते डोनोली मार्ग बंद

 • नांदारी फाट्यावर पाणी आल्यामुळे करंजफेन, माळापुडे,पेंढाखळे मार्ग बंद

 • करुंगळे ते निळे व कडवे ते निळे मार्ग बंद, उचत ते परळे मार्ग बंद

 • गगनबावडा ते कोल्हापूर हा मार्ग पूर्ण बंद

 • राधानगरी - शिरगाव - हा अंशतः बंद आहे. -पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू

 • मुरगूड ते कुरणी हा बंधारा पाण्याखाली

 • पर्यायी रस्ता निढोरी मार्गे कागल

 • सुरूपली ते मळगे हा बंधारा पाण्याखाली

 • पर्यायी रस्ता सोनगे ते बानगे सुरू आहे.

 • बस्तवडे ते अणूर पूल पाण्याखाली,

 • पर्यायी रस्ता निपाणी मार्गे कागल, तसेच सोनगे ते बानगे मार्गे आणूर

 • कोल्हापूर राधानगरी रोडवर घोटवडे येथील चव्हाण ओढा येथे रस्त्यावर तीन फूट पाणी

 • घोटवडे ते ठिपकुर्ली ही वाहतूक स्टार्च कारखान्या मार्गे सुरू आहे.

 • गडहिंग्लज - पोवाडे, नांगनूर, व निलजे हा मार्ग औनापूर धरणावर पाणी असल्याने बंद

 • शिरोली दुमाला जवळील पेट्रोलपंप पूर्ण पाण्याखाली

 • आरळे जवळीलराज्य मार्गावरील पाणी आल्यामुळे वाहतूक बंद

 • पर्यायी रस्ता कांचनवाडी ते भाटणवाडी ही बंद आहे.

 • शिरोली दुमाला, सडोली दुमाला, सावर्डे दुमाला, चाफोडी, गर्जन आरळे पर्यंतचा राज्य मार्ग बंद

 • महे ते करवीर पुलावर पाणी आल्यामुळ वाहतुक बंद

 • महे-बीड पुलावर पाणी आल्यामुळे मार्ग बंद

 • गडहिंग्लज- गारगोटी मार्ग बंद - पांगिरे पुलावर पाणी

 • वाघापूर मुरगूड, वाघापूर आदमापूर मार्ग बंद

 • गारगोटी-कूर -कोल्हापूर रस्ता बंद

हेही वाचा: Kolhapur Rain Update - रामानंदनगरातील ओढ्याचे पाणी 70 घरांत

 • पंचगंगेचे पाणी जामदार क्लबपर्यंत आले आहे.

 • रेणूकामंदिराजवळ पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे.

 • रामानंदनगर परिसरातील लोकांना बोटीतून बाहेर काढले आहे.

 • अॅस्टर आधार हॉस्पीटल जवळील पूल पाण्याखाली गेला आहे.

 • शाहूपुरी कुंभार गल्लीत पाणी शिरल्याने मुर्तीकारांची तारांबळ उडाली आहे.

loading image