Dapoli Police : फलक फाडण्यावरून हर्णे पाजपंढरी परिसरात मोठा तणाव; ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात

सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो ठेवल्याने हर्णे पाजपंढरी परिसरात संतापाची एकच लाट उसळली.
Ratnagiri Dapoli Police
Ratnagiri Dapoli Policeesakal
Summary

हर्णेत एक फलक अनोळखीने फाडल्याचे समजल्यानंतर पाळंदे, हर्णे, पाजपंढरी आदी गावांतील कार्यकर्ते हर्णे बाजारपेठ येथे जमायला सुरुवात झाली.

हर्णे : परिसरात लावण्यात आलेला फलक अनोळखीने फाडला व सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो ठेवल्याने हर्णे पाजपंढरी परिसरात संतापाची एकच लाट उसळली. तेथे जमावाने संशयितांना जोपर्यंत पोलिस ताब्यात घेत नाहीत तोपर्यंत आम्ही हटणार नाही, असा पावित्रा घेतल्यानंतर पोलिसांनी अधिक कुमक मागवली.

अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने संतप्त जमाव शांत झाला. दापोली पोलिसांनी (Dapoli Police) दिलेल्या माहितीनुसार, हर्णेत एक फलक अनोळखीने फाडल्याचे समजल्यानंतर पाळंदे हर्णे पाजपंढरी आदी गावांतील कार्यकर्ते हर्णे बाजारपेठ येथे जमायला सुरुवात झाली. पुन्हा सायंकाळच्या सुमारास हर्णे नवानगर बसस्थानकाच्या जवळील दुसरा फलक फाडला गेल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले.

Ratnagiri Dapoli Police
डोळ्यांदेखत मुलाच्या मृत्यूने आईनेही सोडला प्राण; हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने नागरिकांच्या अश्रूंचा फुटला बांध

याप्रकरणातील आरोपींना पोलीस शोधून आणत नाहीत तोपर्यंत येथील जमाव हलणार नसल्याची भूमिका जमावाने घेतल्याने पोलिसांसमोर पेच निर्माण झाला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी तेथे दाखल झाले. त्यांनी दोषीवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तेंव्हा जमाव शांत झाला.

हर्णेमध्ये रूट मार्च

दापोलीसहीत हर्णेमध्येही पोलिसांनी तातडीने बंदोबस्तासाठी आर.सी.बी फोर्स पाचारण केली. रात्री हर्णेमध्ये जिल्हा अधीक्षक, उपअधीक्षक, दापोली पोलीस निरीक्षक दापोली आणि आर.सी.बी चे पथकांनी मिळून एकत्रित रूट मार्च काढला.

Ratnagiri Dapoli Police
गर्भलिंग निदान छाप्यात आणखी तीन एजंटांना अटक; मुख्य सूत्रधार बनावट डॉक्टर पाटील पोलिसांच्या रेकॉर्डवरील!

दोन संशयितांना अटक

समाजात तेढ निर्माण होईल, असा आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजापुरातही अशीच कारवाई केली. अशा प्रकारच्या वाढत्या घटनांचा विचार करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहर परिसरात पोलिसांनी ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com