
हे उध्वस्त सरकार आहे, अशी खरमरीत टीका भाजपचे नेते खासदार नारायण राणे यांनी केली.
रत्नागिरी - महाविकास आघाडी शासनाची वर्षपूर्ती म्हणजे राज्य अधोगतीकडे नेणारे वर्ष आहे. कोरोनाच्या काळात 12 हजार कोटी रुपये सरकारने खर्च केले. त्यातील कामे नातेवाई आणि जवळच्यांना दिली. यात 3 हजार कोटींचा भ्रष्टाचार करणारे हे उध्वस्त सरकार आहे, अशी खरमरीत टीका भाजपचे नेते खासदार नारायण राणे यांनी केली.
येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत राणे म्हणाले, सरकारची वर्षपूर्ती झाली, मात्र जनतेची इच्छापूर्ती झालेली नाही. शेतकरी, मजूर, नोकरदार, बेरोजगार, सर्वसामान्य, व्यापारी आदीच्या जीवनात कोणतेही परिवर्तन होईल असे काम सरकारने केलेले नाही. मुख्यमंत्री मुलाखत देतात, मात्र त्या मुलाखतीमध्ये आपण काय विकास केला याचा उल्लेख नाही. मुख्यमंत्र्यांचा पायगुण असा की ते आले आणि कोरोना आला. सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात यातच आमचा पहिला नंबर. उपाययोजना करण्यात कमी पडले म्हणूनच मृतांची संख्या वाढली हेच त्यांचे कर्तृत्व. हात धुऊन मागे लागणार, पण कोणाच्या ते सांगा. एकवेळ अशी येईल की, जनताच आपल्या मागे हात धुऊन लागेल आणि तुम्हालाच सत्तेवरून खाली उतरेल. शेतकर्यांना कर्ज माफी दिली मात्र ती तुटपुंजी दिली. फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी 18 हजार कोटीची मदत वाटप केली.
राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलीच नाही. तरूणी, महिलांवर अत्याचार वाढले आहेत. महिलांच्या संरक्षणासाठी पोलिस यंत्रणा लावण्याऐवजी स्वतःसाठी यंत्रणा वापरली जात आहे. खून होत आहेत आणि आत्महत्या दाखविली जात आहे, असे सुडाचे राजकारण केले जात आहे. हिंदुत्वाबाबत तर ठाकरेंनी बोलुच नये. इतिहासातील पहिला मुख्यमंत्री आहे तो घरात बसून काम करतो. गोस्वामीसारख्या पत्रकारांना मारझोड केली गेली, अशी वागणूक देणारे हे पहिले मुख्यमंत्री आहेत. वीज बिल माफीची घोषणा केली. मात्र प्रत्यक्षात काहीच नाही.
हे पण वाचा - तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एक ठार ; घटनास्थळी माणुसकी बोथट
राणे म्हणाले
मिलके खायेंगे, जमके खायेंग, हीच वचनपूर्ती
50 हजार कोटीचे उद्योग येणार, कुठे आहेत ?
भाजपशी बेईमानी केली, हिंदुत्वाला मूठमाती दिली
गद्दारी करुन मुख्यमंत्रीपद; कर्तुत्वाने नाही
हे पण वाचा - आयुष्यभर आईच्या पदराला धरुन राहिला, जीवनाचा शेवटही आईसोबतच झाला ; माय-लेकरावर काळाचा घाला
संपादन - धनाजी सुर्वे