

Shivsena Vs BJP
esakal
Sawantwadi Police Station : सावंतवाडी येथे पालिकेसाठी झालेल्या मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात भाजप-शिंदे शिवसेना यांच्यात वादावादी आणि हमरीतुमरी झाली. सायंकाळी भाजप युवा नेते विशाल परब यांच्या खासगी अंगरक्षकाने मोटार शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्याच्या अंगावर घातल्याच्या आरोपावरून येथील वनविभागाच्या कार्यालयासमोर वादाला सुरुवात झाली. शिवसेनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी संबंधित अंगरक्षकासह मोटार रोखून धरत पोलिसांच्या ताब्यात दिली. यानंतर दोन्ही गट पोलिस ठाण्यात आमने-सामने आल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला.