दैव बलवत्तर होते म्हणूनच वाचले 'त्या' ४६ जणांचे प्राण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bus accident in tilari ghat kokan marathi news

दरीच्या काठावर ओतलेल्या खडीच्या ढिगाऱ्याला बसच्या चेसची  खालील बाजू अडकल्याने ती दरीत कोसळता कोसळता वाचली ..

दैव बलवत्तर होते म्हणूनच वाचले 'त्या' ४६ जणांचे प्राण...

साटेली भेडशी (सिंधुदूर्ग) : कोल्हापूरहून पणजीकडे जाणारी एसटी बस आज सकाळी सव्वा दहाच्या दरम्यान तिलारी घाटातील यू आकाराच्या  मुख्य वळणावर ब्रेकफेल झाल्याने अपघातग्रस्त झाली . दरीच्या काठावर ओतलेल्या खडीच्या ढिगाऱ्याला बसच्या चेसची  खालील बाजू अडकल्याने ती दरीत कोसळता कोसळता वाचली , म्हणून गाडीतील ४६ जणांचे प्राण वाचले .चालकाने  आपल्या बाजूच्या दरवाजाने प्रवाशांना बाहेर काढले .अपघातात वाहकासह चार प्रवासी जखमी झाले .बस मध्ये ४४ प्रवासी होते.

.कागल आगाराची एसटी सकाळी सहा वाजता कोल्हापूरहून सुटली होती .सकाळी दहा वाजता ती तिलारीनगरला पोचली. .तेथून पाच मिनिटांनी ती तिलारी घाटमार्गे पणजीकडे जायला निघाली. .घाटातील यू आकाराच्या तीव्र उतारावरील धोकादायक वळणावर एसटी आली .त्यावेळी ब्रेक लागत नसल्याचे  चालक सिद्धार्थ पाटील यांच्या लक्षात आले. .त्यांनी स्पेशल गियर घातला पण गाडी आवरेना , त्यामुळे त्यांनी हँड ब्रेक लावला , पण गाडी थांबेना .तोपर्यंत गाडी वळणावर पोचली , ती वळवली असती तर पलटी झाली असती.

हेही वाचा- का आली शेतकऱ्यांवर एवढी वाईट वेळ? -

ती थांबली नसती तर

, शेवटी चालकाने गाडी सरळ घेतली ,त्यांच्या सुदैवाने कठड्याजवळ मोठ्या प्रमाणात खडी ओतून ठेवली होती. त्या ढिगाऱ्यावर ती चढली आणि पुढच्या चाकाची मागील बाजू खालच्या चेससह ढिगाऱ्यात रुतली आणि थांबली .गाडीची पुढची चाके दरीच्या काठापर्यंत पोचली होती .ती थांबली नसती तर कड्यावरुन दरीत कोसळली असती .दरी हजारों फूट खोल आहे . त्यामुळे  सर्वच्या सर्व ४६ प्रवासी मृत्युमुखी पडले असते .पण दैव बलवत्तर म्हणून सर्वजण वाचले .एसटी बस गचका देऊन थांबल्याने वाहक निशांत शिवालकर यांचा गुडघा समोरच्या लोखंडी रॉडला आदळल्याने ते जखमी झाले .

तसेच कोल्हापूरहून पत्नीसह पणजीकडे जाणारे गणपत देवराव पायरे जखमी झाले .त्यांच्या नाकाला आणि गुडघ्याला मार लागला  .तसेच तेरवण मेढे येथे महाशिवरात्रोत्सवाला येणाऱ्या भाविकांपैकी काहीजण जखमी झाले .त्यांना नातेवाईकांनी खासगी गाडीतून तेरवण मेढेत नेले .तर अन्य प्रवाशांना दुसऱ्या एसटीतून पुढे पाठवण्यात आले .

हेही वाचा- ब्रेकिंग : नाणार समर्थकांची सेनेतून हकालपट्टी...

अनेक अपघातांचे ठिकाण 

त्या वळणावर अनेक अपघात झालेत .वीस वर्षांपुर्वी दरीत ट्रक कोसळून अनेकजण बळी पडले होते .तर दोन वर्षांपुर्वी एक भाजी विक्रेता  भाजीचा टेंपो पलटी झाल्याने मृत्यू पावला होता .शिवाय अनेक वाहने अपघातग्रस्त होऊन वित्तहानीही झाली होती .काही दिवसांपुर्वी अशीच एक एसटी घाटात अपघातग्रस्त झाली होती .त्यावेळीही प्रवासी सुदैवाने बचावले होते. .

हेही वाचा- नाणारसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांची  राजीनामा देण्याची तयारी....

रस्त्यामुळे  अपघात होतात काय ? 
तत्कालिन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तिलारी घाटासाठी कोट्यवधीचा निधी देऊन घाटाचे रुंदीकरण , मजबुतीकरण आणि डांबरीकरण केले .रस्ता व्यवस्थित झाल्याने वाहनचालक सुसाट वाहने हाकतात .त्यामुळे गाडीवरील ताबा सुटून अपघाताची शक्यता वाढली आहे .अलिकडे सातत्याने होणारे अपघात पाहता नूतनीकरण झालेला रस्ता अपघातास कारणीभूत ठरतो की काय असा प्रश्न विचारला जात आहे. .