
सध्या बाजारपेठेत बहुतांश भाजीपाल्याचे दर गडगडलेले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. काही भाजीपाल्याचे उत्पादन राहू दे, तोडणी व बाजारपेठेपर्यंत पाठविण्याचा खर्चही अंगावर बसत आहे. त्यामुळे उभे पीक नष्ट करण्याची मानसिकता भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची झाली. त्यातून शेतात शेळ्या, रोटर घालण्यात येत आहेत.
का आली शेतकऱ्यांवर एवढी वाईट वेळ?
दानोळी (कोल्हापूर) - सध्या बाजारपेठेत बहुतांश भाजीपाल्याचे दर गडगडलेले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. काही भाजीपाल्याचे उत्पादन राहू दे, तोडणी व बाजारपेठेपर्यंत पाठविण्याचा खर्चही अंगावर बसत आहे. त्यामुळे उभे पीक नष्ट करण्याची मानसिकता भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची झाली. त्यातून शेतात शेळ्या, रोटर घालण्यात येत आहेत.
हे पण वाचा - ब्रेकिंग : नाणार समर्थकांची सेनेतून हकालपट्टी...
दीड-दोन महिन्यांपूर्वी भाजीपाल्याला समाधानकारक दर होता. मात्र काही दिवसांत दर घसरले आहेत. दर एवढे घसरले आहेत की, त्यातून दैनंदिन उत्पादन व वाहतूक खर्चही पेलवेना, अशी परीस्थिती झाली आहे. काहीवेळा विक्रीचे पैसे हमाली, दलाली व वाहतुकीला जात असल्याने शेतकऱ्याच्या हातात फक्त विक्रीची पावतीच येत आहे.
हे पण वाचा - Shivjaynti 2020 : शिराळ्याच्या युवकांनी अमेरिकेत साजरी केली शिवजयंती...
हजारो रुपये खर्च करून रात्रीचा दिवस करून शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहे. मात्र बाजारपेठेत दर नसल्याने शेतक-यांचा हा हंगाम वाया जाण्याची शक्यता आहे. महापूराच्या दणक्यानंतर शेतक-यांनी कष्टाने पुन्हा शेती फुलवली आहे. बाजारपेठेत दरच नसल्याने फुलवलेली शेती स्वत:च्या हाताने नष्ट करण्याची वेळ त्याच्यावर आलेली आहे.
सध्या टोमॅटो उत्पादक शेतक-यांनी मशागत, खते, मल्चींग, लावण, आधारासाठी तार-काट्या, बांधणी, औषध यावर एकरी ७० ते ८० हजार रुपये खर्च केले आहेत. हंगाम सुरू झाल्यापासून दर आठ ते दहा रुपये किले होता. दिवसेंदिवस तो कमी होत पंधरा दिवसांपासून तीन ते चार रुपयांपर्यंत खाली आला आहे. दर वाढेल या अपेक्षेने टोमॅटो बाजारपेठेत पाठवत आहेत, मात्र विक्रीची पट्टीही हातात येईनासी झाली आहे. त्यामुळे तोडणीचा खर्चही मिळेनासा झाला आहे.
हे पण वाचा - गाठून मोका या पोलिसांनी दिला १२ लाखांचा ठोका....
भाजीपाल्यासाठी बाजारपेठ ‘डाउन’
सध्या सर्वच भाजीपाल्यासाठी बाजारपेठ ‘डाउन’ आहे. टोमॅटोचे उत्पादन वाढल्याने बाजारपेठेत आवकही वाढली. मोठ्या बाजारपेठेतही स्थानिक मालाची आवक वाढल्याने तेथेही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे सध्या टोमॅटोच्या दहा किलोला ३० ते ५० रुपये दर असून, पुढील १५ ते २० दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
हजारो रुपये खर्च करून टोमॅटोचे पीक घेतले आहे. चांगल्या दराची अपेक्षा होती. महिनाभरापासून दर कमी होत आहे. सध्या तर दराने नीच्चांक गाठला आहे. वाहतुकीचा खर्चही निघत नाही. त्यामुळे उभ्या पिकात शेळ्या घालण्याचा निर्णय
घेतला आहे.
-प्रतीक चौगुले, त्रिमूर्ती ट्रेडिंग कंपनी, वडगाव
Web Title: Tomatoes Rate Down Market
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..