थरारक! गोव्याला जाणारी चालती आरामबस पेटली

चालती बस एडगाव पाष्टेवाडी येथे जळाल्याचा धक्कादायक प्रकार
bus fire
bus firesakal

वैभववाडी : गोव्याच्या दिशेने ३० प्रवाशी घेवुन निघालेली चालती बस एडगाव पाष्टेवाडी येथे जळाल्याचा धक्कादायक प्रकार आज ता.३ पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास घडला.प्रवाशांचे सर्व साहीत्य जळाले असुन सुदैवाने कोणत्याही प्रवाशांला दुखापत झालेली नाही.

bus fire
‘पीएनजी’मध्ये ‘डायमंड फेब धमाका’ ; घडणावळीवर १०० टक्क्यांपर्यंत सवलत

पुणेहुन गोव्याकडे निघालेली आरामबस (क्रमांक जीए-०३,डब्ल्यु-२५१८)करूळ घाटातुन उतरल्यानंतर पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास एडगाव पाष्टेवाडी येथे आली असता या गाडीने अचानक पेट घेतली.गाडीतुन धुर येण्यास सुरूवात झाल्यामुळे चालकाने गाडी थांबविली.चालकाने गाडीतुन उतरून पाहील्यानंतर गाडी पेटण्यास सुरूवात झाली होती.त्याने आरडाओरडा करीत प्रवाशांना गाडीतुन तत्काळ खाली उतरण्यास सांगीतले.गाड झोपेत असलेले प्रवाशी खडबडुन जागे झाले.प्रवाशांनी कसलीही पर्वा न करता गाडीतुन उतरण्यास प्राधान्य दिले.

bus fire
अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा ; चव्हाण

गाडीतील सर्वच्या सर्व ३० प्रवाशी गाडीतुन उतरले.मात्र या प्रवाशांचे सर्व साहीत्य गाडीतच होते.अनेक प्रवाशांचे किमंती साहीत्य गाडीत होते.परंतु पुर्ण गाडीने पेट घेतल्यामुळे ते बाहेर काढणे अशक्य होते.प्रवाशांच्या समोरच गाडीतील साहीत्य देखील जळत होते.आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला परंतु आग विझली नाही.पहाटेच्या या प्रकाराने एकच खळबळ माजली.पोलीसांना ही माहीती मिळाल्यानंतर वैभववाडी पोलीस घटनास्थळी पोहोचले.त्यांनी प्रवाशांची विचारपुस करीत त्यांना दुसऱ्या गाडीने पाठविले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com