esakal | 'केंद्राच्या योजना पोचवताना भाजप निवडणुका लढणार स्वबळावर'
sakal

बोलून बातमी शोधा

'केंद्राच्या योजना पोचवताना भाजप निवडणुका लढणार स्वबळावर'

१७ सप्टेंबर या अभियान समाप्ती दिवशी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे राज्यातील सुमारे ९३ हजार बूथ अध्यक्षांशी थेट संवाद साधणार आहेत.

'केंद्राच्या योजना पोचवताना भाजप निवडणुका लढणार स्वबळावर'

sakal_logo
By
- मकरंद पटवर्धन

रत्नागिरी : केंद्रातील भाजप सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि लोकसभा, विधानसभा निवडणुकीची स्वबळावर तयारी करण्याकरता समर्थ बूथ अभियान सुरू केले. रत्नागिरी जिल्ह्यात ८५३ पैकी ६८८ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९१६ पैकी ९१२ बूथप्रमुख व समित्या नेमल्या आहेत. या सर्व सदस्यांशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील उद्या (ता. ७) ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत, अशी माहिती समर्थ बूथ अभियानचे रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा समन्वयकअतुल काळसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भाजपच्या द. रत्नागिरी जिल्हा कार्यालयात सोमवारी सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्यासमवेत शहराध्यक्ष सचिन करमरकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे आणि महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष ऐश्वर्या जठार उपस्थित आदी होते. काळसेकर म्हणाले, २०२४ मध्ये निवडणुका होणाऱ्या महाराष्ट्रातील ४८ लोकसभा आणि २८८ विधानसभा स्वबळावर लढवून जिंकण्यासाठी प्रदेश भाजपाने समर्थ बूथ अभियान या महत्त्वाकांक्षी अभियानाची सुरूवात केली.

हेही वाचा: खरमाटेंचे 750 कोटींचे साम्राज्य पाहणीसाठी सोमय्या सांगलीत

दोन महिने याचे काम सुरू होते. ६ जुलै हा जनसंघाचे पहिले अध्यक्ष स्व. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्मदिवस. या दिवशी अभियानाची सुरवात झाली. १७ सप्टेंबर हा पंतप्रधान मोदी यांचा जन्मदिवस आहे. या दिवशी अभियानाची सांगता होणार आहे. १७ सप्टेंबर या अभियान समाप्ती दिवशी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे राज्यातील सुमारे ९३ हजार बूथ अध्यक्षांशी थेट संवाद साधणार आहेत.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचे चांगले मताधिक्य असून भाजपच्या प्रत्येक बूथची रचना करण्यात आली. दोन्ही जिल्ह्याचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन आणि राजन तेली यांनी हे बूथरचनेचे काम पूर्ण केले आहे. स्टार्ट अप योजनेत आत्मनिर्भर योजनेसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे हे या बूथचे काम आहे. अधिकारी वर्ग या योजना तळागाळात पोहोचवत नसल्याच्या प्रश्नावर काळसेकर म्हणाले, भाजपचे कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत. दोन्ही जिल्ह्यांमध्ये अनेक योजनांची माहिती दिली जात असून आगामी काळात लाभार्थ्यांची संख्या वाढत आहेत.

हेही वाचा: Live Update : बेळगावात गर्दी पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज

सिंधुदुर्गमध्ये ९१६ द. रत्नागिरीत ८५३ बूथ आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यातील शक्तिकेंद्र आणि बुथवरील बैठका सुरू आहेत. पूर्वी युती असल्यामुळे अनेक ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळाली नाही तेथे आता स्वबळावर निवडणुका लढवल्या जात आहेत. आगामी निवडणुकीत भाजपचे उमेदवार विजयी होती, असा विश्वास अतुल काळसेकर यांनी व्यक्त केला.

loading image
go to top