
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील युवकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुख्यमंत्री फेलोशिप योजना आखली होती.
महविकास आघाडीचा फडणवीसांना दणका : ही योजना केली बंद..
वेंगुर्ले (सिंधुदूर्ग) : एकीकडे दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत चालली असून त्यावर उपाययोजना काढणे सोडून फडणवीस सरकारच्या विविध योजनांना स्थगिती देणाऱ्या महविकास आघाडी सरकारने पदवीधर युवक-युवतींसाठी सुरू असलेली मुख्यमंत्री फेलोशिप योजना बंद करून युवकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.
कोकण विभागाचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली कोकणात पदवीधर युवक-युवतींना सोबत घेऊन शासनाच्या या अन्यायकारक धोरणाचा निषेध करणार आहे, अशी माहिती भाजपचे माजी तालुकाध्यक्ष प्रसन्ना ऊर्फ बाळू देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
हेही वाचा- धक्कादायक ! `येथे` सीलबंद बाटलीऐवजी नळाच्या पाण्याची विक्री
युवकांना सहभाग मिळण्यासाठी योजना
पत्रकात म्हटले आहे, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील युवकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुख्यमंत्री फेलोशिप योजना आखली होती. युवकांची कल्पकता, नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानाची कास रुजवण्यासाठी फडणवीस सरकारने हा उपक्रम राबवला होता. प्रशासनामध्ये युवकांना सहभाग मिळण्यासाठी ही योजना आणली होती.
हेही वाचा- रत्नागिरी जिल्ह्यात होणार कालव्यांचे 250 किमीचे जाळे
योजनामुळे नामवंतांच्या भेटीची संधी
युवकांचा उत्साह, नावीन्यपूर्ण दृष्टिकोन व तंत्रज्ञानातील त्यांची गती याचा प्रशासनास उपयोग व्हावा तसेच युवकांनाही शासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा हा या योजनेचा हेतू होता. या योजनेस राज्यातील विविध नामांकित संस्थांना भेटी तसेच उद्योग, कला, लेखन, पत्रकारिता, मनोरंजन आदी क्षेत्रातील नामवंतांच्या भेटीची संधीही मिळत होती. धोरण, प्रशासन, राज्यशास्त्र, व्यवस्थापन या क्षेत्रातील उच्चशिक्षित व व्यावसायिक संधी या उपक्रमातून मिळाली होती.
हेही वाचा- मुंबई गोवा मार्गावर येथे होतोय सर्वात मोठा भुयारी मार्ग
...हे तर निव्वळ राजकारण!
या योजनेतून राज्यातील विकास प्रक्रियेतील टप्पे जाणून घेता येत होते. शासकीय कामकाज निर्णय प्रक्रियेतील अनुभव मिळत होता. या योजनेमध्ये दरवर्षी 50 जणांची निवड केली जात असे; परंतु ज्याप्रमाणे फडणवीस सरकारच्या विविध योजनांना स्थगिती देणाऱ्या स्थगिती सरकारने पदवीधर युवक-युवतींच्या बाबतीत राजकारण करून मुख्यमंत्री फेलोशिप योजना बंद केली व तसा आदेश शासनाच्या नियोजित विभागाने 30 जानेवारीला जाहीर केला, असे पत्रकात म्हटले आहे.
Web Title: Chief Minister Fellowship Drop Sindudurg Kokan Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..