Children's Day 2021: बाल वैज्ञानिक विवेक कोळीने सर्वात कमी वजनाचा उपग्रह केला तयार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाल वैज्ञानिक विवेक कोळीने सर्वात कमी वजनाचा उपग्रह केला तयार

बाल वैज्ञानिक विवेक कोळीने सर्वात कमी वजनाचा उपग्रह केला तयार

sakal_logo
By
अमित गवळे - सकाळ वृत्तसेवा

पाली : डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनँशनल फाउंडेशन व स्पेस झोन इंडिया अंतर्गत पेलोड क्युब्ज चँलेंज 2021 या प्रकल्पाद्वारे सुधागड तालुक्यातील विवेक प्रदिप कोळी या बाल वैज्ञानिकाने सर्वात कमी वजनाचा उपग्रह (satellite) जेएसपीएम कॉलेज पुणे येथिल कार्यशाळेत बनविला.

हेही वाचा: ब्रँड अँबेसिडर राहिलेल्या विक्रम गोखलेंनी एसटीच्या संपावर व्यक्त केल्या भावना!

फेब्रुवारी महिन्यात तामीळनाडु रामेश्वरम येथुन हा उपग्रह यशस्वी लाँचिंग करण्यात आला. त्यानंतर विवेकच्या या उपक्रमाने अनेक विक्रमाची केली नोंद केली आहे. जमिनीपासुन 38 हजार मीटर उंचीवर हेलियमद्वारे सदर उपग्रह अवकाशात जाऊन वातावरणातील बदल टिपत आहे आहे. या साठी डॉ. मनिषाताई चौधरी व मिलिंद चौधरी सरांचे मोलाचे मार्गदर्शन विवेक याला लाभले होते.

विशेष म्हणजे विवेकाचे वडील प्रदीप कोळी व आई रागिणी कोळी हे सुधागड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक आहेत. सर्वाना अभिमान वाटावा अशीच कामगिरी विवेक कोळी याने केली असून यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा: ..त्यापेक्षा विक्रम गोखलेंनी राजकीय पक्षात प्रवेश करावा- पृथ्वीराज चव्हाण

अनेक विक्रमांवर कोरले नाव

विवेकच्या या उपक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, असिस्ट बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ड बुक ऑफ रेकॉर्ड आणि गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. अशा प्रकारे जागतिक विक्रम करीत विवेक प्रदीप कोळी याने सर्व रेकॉर्ड आपल्या नावे नोंद केले आहेत.

विवेकने नुकतेच "न्यू स्किल ऑफ 21 सेंच्युरी" विद्यार्थ्यांच्या पुढिल आव्हाने आणि करिअर या विषयावरील इनोव्हेशन मध्ये सहभाग घेऊन प्रमाणपत्र ही प्राप्त केले आहे

loading image
go to top