चिपळूण : पहिल्याच पावसाळ्यात महामार्ग चिखलमय

चिपळूण शहरातील चित्र, दुचाकी घसरण्याचे प्रकार सुरू
महामार्ग चिखलमय
महामार्ग चिखलमयsakal

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करताना शिवाजीनगर परिसरात मातीचा भराव टाकल्याने पहिल्याच पावसाळ्यात येथील रस्ता चिखलमय झाला आहे. यामुळे महामार्गावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथे दुचाकी वाहने घसरण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. चिखलमय रस्त्यावर मंगळवारी दुपारी चार दुचाकी सरपटल्या. त्यामध्ये तीन दुचाकी महाविद्यालयीन युवकांच्या होत्या.

ऐन पावसाळ्यात मातीचा भराव टाकून काम सुरू करण्यात आल्याने येथून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करताना शहरात उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. तत्पूर्वी अंतर्गत सर्व्हिस रोड तयार केले जात आहेत. त्यासाठी जुना रोड आणि नवीन सर्व्हिस रोड जोडताना मातीचा भराव टाकण्यात आला आहे. सोमवारपासून शहरात पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे रस्त्यासाठी टाकलेली भरावाची माती दोन्ही बाजूने सुमारे अडीज कि.मी. पर्यंत वाहून सुमारे अडीच कि. मी.चा रस्ता चिखलमय झाला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

महापुराचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे काम गेली सहा महिने सुरू आहे; मात्र राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून आपत्ती निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. मातीचा भराव टाकल्यानंतर पावसाळ्यात चिखल होणार आहे. त्यामुळे अंतर्गत रस्त्याची कामे पावसाळ्यापूर्वीच व्हायला हवी होती; मात्र गेली सहा महिने कोणतेही प्रय़त्न झाले नाहीत. ऐन पावसाळ्यात रस्त्यावर मातीचा भराव टाकल्यामुळे शिवाजीनगर ते डीबीजे महाविद्यालयापर्यंतचा मार्ग चिखलमय झाला आहे. याच मार्गावर महाविद्यालय आणि माध्यमिक विद्यालय आहे. त्यामुळे महामार्ग विभागाने विशेष काळजी घ्यायला हवी.

राष्ट्रीय महामार्ग चिखलमय झाला असल्याने पावसाळ्यात वाहन चालवताना अनेक अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. या चिखलातून गाडी चालवणेदेखील कठीण जात आहे. याचा जास्त फटका दुचाकी वाहनचालकांना होत आहे. येथे चिखल असल्याने गाडी स्लिप होऊन दुचाकीस्वार पडू शकतो तर काहीवेळा चिखल साचल्याने अचानकपणे लेन बदलावी लागते. त्यामुळे मागून वेगाने येणाऱ्या गाडीची टक्कर होऊ मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- शशिकांत मोदी, माजी नगरसेवक चिपळूण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com