

ST bus drivers and conductors
sakal
चिपळूण : चिपळूण एसटी आगारातील कर्मचाऱ्यांची पुढील आठवड्यापासून अल्कोटेस्ट मशीनद्वारे ब्रेथ ॲनालायझर चाचणी सक्तीने घेतली जाणार आहे. एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा, यासाठी चिपळूण आगाराने हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.