'रिफायनरी संदर्भात मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील' - राऊत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'रिफायनरी संदर्भात मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील' - राऊत

ग्रामस्थांनी खासदार राऊत यांना निवेदन देताना रिफायनरी प्रकल्पाची उभारणी नेमकी का करावी, याचे सविस्तर विवेचन केले.

'रिफायनरी संदर्भात मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील' - राऊत

राजापूर : राजापूर तालुक्यातील सोलगाव-बारसू या ठिकाणी रिफायनरी प्रकल्प (refinery project, konkan) उभारणीसंबंधित लोकांचे जे म्हणणं आहे, ते जशाच तसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कानावर पुढील आठवड्यामध्ये घातले जाईल. त्यानंतर ते रिफायनरीसंबंधी योग्य तो पुढील निर्णय घेतील, असे खासदार विनायक राऊत (vinayak raut) यांनी रिफायनरी समर्थक ग्रामस्थांच्या भेटीच्यावेळी आश्‍वासन दिले. (konkan News)

सोलगाव-बारसू परिसरातील चर्चेत असलेल्या रिफायनरी प्रकल्पासंबंधी खासदार राऊत आणि आमदार साळवी यांची शासकीय विश्रामगृहावर तालुक्यातील बारसू, सोलगाव, नाटे दशक्रोशीतीत शेकडो ग्रामस्थांनी डॉक्टर, वकील, व्यापारी, आंबा बागायतदार, मच्छीमार यांच्यासह भेट घेतली. ग्रामस्थांनी खासदार राऊत यांना निवेदन देताना रिफायनरी प्रकल्पाची उभारणी नेमकी का करावी, याचे सविस्तर विवेचन केले. त्यानंतर खासदार राऊत यांनी रिफायनरी समर्थक ग्रामस्थांशी संवाद साधला.

हेही वाचा: Konkan - जिल्ह्यातील सोलगाव - बारसूवासियांना हवा रिफायनरी

ते म्हणाले, सोलगाव-बारसू येथे रिफायनरी उभारणीसंबंधी शासनस्तरावर सद्यस्थितीमध्ये कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. शिवसेना संघटना पातळीवरही कोणतीही चर्चा झालेली नाही. असे असले तरी प्रकल्पासंबंधी नाण्याच्या दोन्ही बाजू आम्ही समजून घेत आहोत. विरोधकांचे यापूर्वी निवेदन स्वीकारले असून आता प्रकल्प समर्थकांचेही म्हणणे आणि निवेदन स्वीकारले आहे.

निवेदन आणि म्हणणे सादर करणार

रिफायनरी प्रकल्प उभारणीसंबंधी आपल्या असलेल्या भावना आणि मागणी या भागाचे लोकप्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्यापुढे मांडल्या जातील. त्यानंतर मुख्यमंत्री योग्य ते निर्णय घेतील. पुढील आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांना समर्थकांचे निवेदन आणि म्हणणे सादर करणार आहोत, असेही ते म्हणाले.

हेही वाचा: महापुराने बरबाद झालेल्या 'लोटिस्मासाठी' सामंतांची मोठी घोषणा

Web Title: Cm Uddhav Thackeray Takes Decision Says Vinayak Raut In Konkan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top