esakal | ढोल - ताशा नसला तरी उत्साह मात्र अवर्णनीय
sakal

बोलून बातमी शोधा

completion of ganesh festival and konkani people say bye to bappa without crowd

जिल्ह्यात मंगळवारी 11 दिवसांच्या जिल्ह्यातील 36 हजार 700 घरगुती तर 48 सार्वजनिक गणपतींचे विसर्जन पार पडले. 

ढोल - ताशा नसला तरी उत्साह मात्र अवर्णनीय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' ची आळवणी करत मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या मुर्हूतावर गणेशाला जिल्हावासियांनी निरोप दिला. जिल्ह्यात मंगळवारी 11 दिवसांच्या जिल्ह्यातील 36 हजार 700 घरगुती तर 48 सार्वजनिक गणपतींचे विसर्जन पार पडले. कोरोनामुळे ना मिरवणूक, ना ढोल - ताशांचा गजर, मात्र गणेश भक्तांचा उत्साह अवर्णनीय होता.

हेही वाचा - या गावात दगड वापरायला बंदी आहे ! गावात दगडी बांधकाम केलेले घर औषधालाही नाही सापडणार...

जिल्ह्यात सुमारे 1 लाख 66 हजार 660 गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे गणेश विसर्जन सोहळे अगदी साधेपणाने मात्र भक्तीमय वातावरणात पार पडले. ज्यापमाणे अकरा दिवसांसाठी घरी आलेल्या बाप्पाचे स्वागत उत्साही वातावरणात झाले, त्याच उत्साहात हळव्या अंत:करणाने गणेशभक्तांनी मंगळवारी बाप्पाला निरोप दिला. या विसर्जन सोहोळयावेळी देखील कुठेही जल्लोष नव्हता.  

हेही वाचा - महाराष्ट्रात असंही एक गाव आहे; या गावात कधीच विकला जात नाही चहा

अगदी साधेपणाने केवळ 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' अशी साद घालत आणि जगावर ओढवलेले कोरोनाचे संकट दूर करण्याचे साकडे घालत विसर्जन पार पडले. दुपारपासूनच गणरायाचे विसर्जन सुरू झालेले होते. यावेळेस दरवर्षीपमाणे होणारी गर्दी टाळून सोशल डिस्टन्सचे भान राखत रत्नागिरीत मांडवी चौपाटी, भाट्ये, पांढरासमुद्र, किल्ला, मिऱ्या येथ विसर्जन करण्यात आले. शहरात न.प.ने कृत्रिम तलावांची व्यवस्था केल्याने भाविकांकडून गणपतींचे विसर्जन केले जात होते.

संपादन - स्नेहल कदम 

loading image