
ओबसींनो जागे व्हा, २०२४ ला केंद्रातील सरकारला हद्दपार करा, पटोलेंचा हल्लाबोल
रत्नागिरी : केंद्रातील भाजपचे सरकार ओबीसींवर सूड उगवत आहे. केंद्राने इंम्पीरीकल डाटा न दिल्यामुळे न्यायालयात ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) विषय टिकला नाही. हे आरक्षण रद्द होण्याला केंद्र सरकार जबाबदार आहे. त्यामुळे ओबसींनो जागे व्हा, २०२४ च्या निवडणुकीत केंद्रातील सरकारला हद्दपार करा, अशी हाक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली. तसेच महाराष्ट्रातही काँग्रेसचे सरकार येईल, असा विश्वासही व्यक्त केला.
काँग्रेसच्या ओबीसी सेलतर्फे रत्नागिरीत आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, ‘केंद्रात काँग्रेस सरकार असताना तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी इंम्पिरिकल डाटा तयार केला होता. भाजपचे (BJP) सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी ओबीसींना संपविण्याचा घाट घातला. केंद्राने इंम्पिरिकल डाटा न दिल्यामुळे ओबीसींचे आरक्षण गेले. संविधानाला हात न लावता पारंपरिक व्यवस्था केंद्र सरकार (Central Govt) संपवू पहात आहे. निवडणुकीनंतर जातीयवाद निर्माण करून त्या जोरावर निवडणूका जिंकण्याचा फंडा भाजपने सुरू केला आहे. कोकणात ओबीसींना चेपण्याचे काम मोठ्याप्रमाणात सुरू आहे.
याबाबत काँग्रेसच्या ओबीसी सेलने जनतेत जाऊन जनजागृती केली पाहिजे. येथील बारा बलुतेदारांना एकत्र आणून मनुवाद्यांचे मनसुबे उधळून लावले पाहिजेत,’ असे सांगून ते म्हणाले, ‘प्रत्येक राजकीय पक्षाला पक्ष वाढविण्याचा हक्क आहे. त्यानुसार काँग्रेस आपला पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. बांद्यापासून चांद्यापर्यंत काँग्रेस मजबूत करणार आहोत. त्याची सुरवात रत्नागिरीतून झाली आहे. सध्या महाविकास आघाडी सरकार मजबूत आहे, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. (Konkan news)
यावेळी दुग्ध व्यवसाय तथा क्रीडामंत्री सुनिल केदार, माजी खासदार हुसेन दलवाई, जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, हुस्नबानू खलपे, विकास पाटील, दीपक राऊत, अशोक जाधव आदी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी भाजपा सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेचे झोड उठवत महाराष्ट्रातील मित्रपक्षांनाही चिमटे काढले.
हिजाब नको हिशोब द्या ः पटोले
कर्नाटकमध्ये हिजाबचा प्रश्न पाकिस्तानने निर्माण केल्याचा शोध भाजपने लावला आहे. आता हिजाब मुद्दा नव्हे तर हिशोब द्यायचा मुद्दा पुढे येतोय. २०२४ च्या निवडणुकीत हिशोब द्या हे जनताच तुम्हाला सांगेल. ‘छप्पन इंच सीना’ असल्याचे सांगणाऱ्या प्रधानसेवकांने २३ सार्वजनिक उपक्रम विकून टाकले. तर संरक्षण खात्याची ६५ हेक्टर जमीन विकण्याचा घाट घातल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.