संघर्ष यात्रेला राणे जाणार; नेतृत्वही करणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राधाकृष्ण विखे-पाटील आदी उपस्थित राहणार आहे. या यात्रेचे नेतृत्व राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे करणार आहेत. यावेळी माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे उपस्थित राहणार आहेत.

- संजय परब

सावंतवाडी : जिल्ह्यात उद्या (ता. 18) दाखल होणार्‍या संघर्ष यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या निमित्ताने काँग्रेस, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते जिल्ह्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या संघर्ष यात्रेच्या समारोपाचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री नारायण राणे करणार आहेत. याला शेकडो शेतकरी आणि बागायतदार उपस्थित राहतील असा दावा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी आज केला.

काय म्हणाले होते राणे चार दिवसांपूर्वी?

श्री. परब आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी विशाल परब, वासुदेव परब उपस्थित होते. यावेळी श्री. परब म्हणाले, “शेतकर्‍यांच्या आत्महत्या, कर्जमाफी आदी प्रश्‍नाबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या संघर्ष यात्रेचा समारोप उद्या (ता.18) येथे होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राधाकृष्ण विखे-पाटील आदी उपस्थित राहणार आहे. या यात्रेचे नेतृत्व राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे करणार आहेत. यावेळी माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. या यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यातील वादळात नुकसान झालेले शेतकरी आणि बागायतदार तसेच अनेक वर्षे प्रश्‍न प्रलंबित असलेले मच्छीमार बांधवानी उपस्थित रहावे.” 

याठिकाणी यात्रेचा समारोप होणार असल्यामुळे जिल्हाभरातून शेकडो काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. समारोपाचा हा कार्यक्रम सायंकाळी साडे चार वाजता येथील राणी पार्वतीदेवी हायस्कुलच्या पटांगणावर होणार आहे. यावेळी सर्व शेतकरी बागायतदार आणि व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री. परब यांनी केले आहे.

Web Title: Congress leader Nayaran Rane to participate in Sangharsh Yatra in Sindhudurg