esakal | खड्डे चुकवा, बक्षीस मिळवा राष्ट्रवादीची जोरदार चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

खड्डे चुकवा, बक्षीस मिळवा राष्ट्रवादीची  जोरदार चर्चा

खड्डे चुकवा, बक्षीस मिळवा राष्ट्रवादीची जोरदार चर्चा

sakal_logo
By
- राजेश शेळके

रत्नागिरी : शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेकडे पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस आणि विद्यार्थी कॉंग्रेस (Nationalist Youth Congress and studentsCongress) यांच्यावतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. खड्डे चुकवा, बक्षीस मिळवा, असे या आंदोलनाचे नाव आहे. तसेच रस्त्याची विदारक स्थिती असतानाही निमुटपणे आणि शांतपणे हे सर्व सहन करणाऱ्या नागरिकांना सहनशिलते बद्धल गुलाब पुष्प देऊन कौतुक करण्यात आले. राष्ट्रवादीच्या या आंदोलनाची आज शहरात चांगलीच चर्चा होती. (Congress NCP Road Agitation In Ratnagiri News akb84)

रत्नागिरी शहरातील रस्ते, अक्षरशः खड्ड्यात गेले आहेत. रस्ते दुरूस्तीला संधी मिळाली नाही. तौत्के चक्रीवादळ, त्यानंतर पाऊस लवकर सुरू झाल्याने १० कोटीची रस्त्याची कामे मंजूर असतानाही करता येत नाहीत, असा खुलासा सत्ताधाऱ्यांकडुन केला जात आहे. मात्र यापूर्वी अशी वाईट परिस्थिती कधीच रत्नागिरीकरांवर आली नव्हती. लांबलेले काम आणि त्यात लॉकडाऊनचा फायदा घेऊन पाणी योजनेच्या पाइपलाइनसाठी खोदलेले रस्ते यामुळे शहराची दुरावस्था झाली आहे.

सत्ताधाऱ्यांना यासाठी जबाबदार धरत भाजप, राष्ट्रावदी कॉंग्रेसकडुन जोरदार आरोप केले जात आहेत. आंदोलने सुरू झाली आहे.राष्ट्रवादी युव कॉंग्रेस आणि विद्यार्थी कॉंग्रेसने आज आगळे-वेगळे आंदोलन केले. समस्त रत्नागिरीकरांसाठी, "खड्डे चुकवा,बक्षीस मिळवा" हे अनोखे आंदोलन करण्यात आले. ही स्पर्धा राम नाका ते राधाकृष्ण नाका, या ठिकाणी घेण्यात आली.पुरती दुरावस्था झालेल्या रस्त्यातून आपण खड्डे चुकवून जाऊच शकत नाही, अशी खात्री बाळगून नागरिकांनी सहभाग न घेणे, हा पर्याय निवडला. दुरावस्था झालेल्या रस्त्याबद्दल एकही शब्द न बोलता, शांतपणे हे सगळं सहन करत आलेल्या रत्नागिरीतील नागरिकांना त्यांच्या सहनशीलते बद्दल गुलाब पुष्प देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.

हेही वाचा: कोकणाला 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा; गडनदीला पूर

नागरिकांच्या झालेल्या गैरसोयीमुळे पुन्हा या पालिकेतील भ्रष्ट सत्ताधाऱ्यांना निवडून न देण्याचे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी आणि युवक काँग्रेसकडुन रत्नागिरीकरांना करण्यात आले. तसेच गोखले नाका ते गडीतळ, फाटक हायस्कूल ते परटवणे, काँग्रेस भवन ते भुते नाका, मांडवी बीच ते भुते नाका, जेल नाका ते डी.एस.पी.बंगला व उर्वरित शहरी भागातील काही इतर ठिकाणचे रस्ते देखील या आंदोलनासाठी योग्य असण्याचे सिद्ध झाले. रत्नागिरीतील नागरिकांना हे अनोखे आंदोलन भावले असून शहरात त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

loading image