esakal | यंदा गुढीपाडव्याला मिळणार फक्त पोळीच....
sakal

बोलून बातमी शोधा

 corona inpct  gudi padwa in ratnagiri kokan martahi news

यंदा प्रथमच गुढीपाडव्याला संघाचा उत्सव यंदा होणार नाही. कोरोनामुळे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

यंदा गुढीपाडव्याला मिळणार फक्त पोळीच....

sakal_logo
By
मकरंद पटवर्धन

रत्नागिरी :  कोरोनामुळे लॉकडाऊन, जिल्ह्याच्या सीमा बंद आणि संचारबंदी अशा अभूतपूर्व स्थितीमुळे उद्या (ता. 25) मराठी नववर्ष म्हणजे गुढीपाडवा उत्सवावर विरजण पडले आहे. साडेतीन मुहुर्तापैकी एक गुढीपाडव्याला रत्नागिरी जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल कोरोना (कोव्हिड-19) विषाणूमुळे ठप्प होणार आहे. दुचाकी, चारचाकी गाड्या, फ्रीज, टीव्ही, मोबाईल, सोनेखरेदी, फर्निचर, कपडे यासह सर्व प्रकारची मोठी खरेदी लॉकडाऊनमुळे होऊ शकत नाही.

यंदा गुढीपाडवा शोभायात्रा यापूर्वीच रद्द करण्यात आली आहे.
चैत्र शुद्ध प्रतिपदा हा सृष्टीच्या निर्मितीचा पहिला दिवस मानला जातो. ब्रह्मपुराणानुसार ब्रह्मदेवाने प्रतिपदेला सूर्योदयाच्या वेळी सृष्टी निर्माण केली आणि कालगणनेला प्रारंभ केला. प्रभू श्रीरामाने रावणावर विजय मिळवून याच दिवशी अयोध्येत प्रवेश केला. त्यामुळे गुढ्या, तोरणे उभारून हा विजय दिवस साजरा होतो. यंदा जिल्ह्यातील सर्व मंदिरेही बंद असल्याने घरात बसूनच हा सण साजरा करावा लागणार आहे.

हेही वाचा- ब्रेकिंग -  मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचा शिक्षणमंत्र्यांकडून भंग...
गुढीपाडव्याला गोडधोड पक्वान्न केले जाते. त्यामुळे मेवा-मिठाईची दुकाने दरवर्षी सजतात. श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, खीर, पुरणपोळी, गुलाबजाम आदी पक्वान्नांना दुकानात मागणी असते. दुकाने बंद असल्याने यंदा गुढीपाडव्याला घरचे पक्वान्न मिळणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीचा आनंद यंदा मिळणार नाही. सोनेखरेदीसाठी तर गुढीपाडवा हा महत्त्वाचा दिवस असतो. तसेच पुढे विवाहाचे मुहुर्त असल्यानेही सोनेखरेदीसाठी गर्दी असते. परंतु लॉकडाऊनमुळे ही दुकाने उद्या उघडू शकणार नाहीत.

 हेही वाचा- भारीच : शाळेला सुट्टी, बट लर्न फ्रॉम होम विथ मल्टिमिडीया.... सुट्टी नाॅट..

रा. स्व. संघाच्या 150 शाखा बंद

रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 150 शाखा बंद ठेवण्यात आल्या आहेत. देशभरात संघाच्या 25 हजारहून अधिक शाखा बंद आहेत. यंदा प्रथमच गुढीपाडव्याला संघाचा उत्सव यंदा होणार नाही. कोरोनामुळे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, अशी वेळ संघाच्या इतिहासात प्रथमच आली आहे, अशी माहिती संघाचे द. रत्नागिरी जिल्हाप्रमुख आनंद मराठे यांनी दिली.