esakal | कोरोनाच्या लढ्यासाठी दापोलीकरांनी लढवली अशी युक्ती....
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus security all people in ratnagiri kokan marathi news 

गावामध्ये बाहेरची कोणी  व्यक्ती आला तर त्याची नोंद ग्रामपंचायतीत करावी,  गर्दी असताना परस्परांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे अशी विविध प्रकारची माहिती,  माहिती पत्रकाद्वारे गावकऱ्यांना दिली गेली आहे.

कोरोनाच्या लढ्यासाठी दापोलीकरांनी लढवली अशी युक्ती....

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दापोली (रत्नागिरी) : सध्‍या कोरोना विषाणूची धास्ती शहराबरोबरच ग्रामीण भागातही वाढली असून या विषाणूचा शिरकाव आपल्या गावात न होण्यासाठी गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. दापोली तालुक्यातील पंचनदी गावानेही यासाठी पुढाकार घेतला असून पंचनदीकरांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या छोट्या छोट्या गोष्टी मधुनही कोरोनाला कसे दूर ठेवता येते याचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.

कोरोनाला  दूर ठेवण्यासाठी पंचनदी, आघारी, बोरीवली येथील  काही उत्साही मंडळी एकत्र आली आणि त्यांनी या राष्ट्रीय आपत्तीमध्ये आपण आपल्या शासनाला आणि आपल्या गावाला आपल्याला जमेल तशी आणि शक्य होईल तेवढी मदत करूया असे ठरविले. सुनिल मोडक,  विकास जाधव, सुंदर राणे आणि उदय मयेकर, महेश जाधव, महेश धोपट, साक्षी मयेकर व त्यांचे सहकारी यासाठी एकत्र आले या मंडळींनी कोरोनाचा  प्रसार होऊ नये म्हणून घ्यायची जी काळजी आहे ती चक्क एका खणखणीत आवाजात रेकॉर्ड केली आणि एका वाहनांमधून ती पंचनदी आणि परिसरातील गावांमधून रस्त्यांमधून, गल्लीमधून दररोज प्रसारित केली जाते.

हेही वाचा- बाळ-बाळंतिण सुखरूप पोचली घरी..

प्रसार माध्यमाचा केला योग्य वापर

इतकेच नव्हे तर ग्रामपंचायतीच्या  सदस्य साक्षी मयेकर यांचा वैयक्तिक मोबाईल क्रमांक हा 24 तास हेल्पलाइन म्हणून जाहीर केला आहे कोरोना  संदर्भात कुठलीही माहिती , कुठलीही मदत  हवी असेल तर या तीन गावांमधील नव्हे तर बाहेरचे लोकही या हेल्पलाईन वर संपर्क साधून मदत मिळवतात एवढ्यावरच न थांबता पंचनदीकरानी त्यांच्या  माध्यमिक शाळेतील  एका खोलीत विलगीकरण कक्षासाठी जागा ठेवली असून गरज भासल्यास गाव पातळीवर हा कक्ष  सुरु करण्याचे ठरवले आहे.

हेही वाचा-ब्रेकिंग - इस्लामपुरातील आणखी एकाला कोरोनाची लागन

केल्या जातात अश्याही नोंदी

 गावामध्ये बाहेरची कोणी  व्यक्ती आला तर त्याची नोंद ग्रामपंचायतीत करावी,  गर्दी असताना परस्परांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे अशी विविध प्रकारची माहिती,  माहिती पत्रकाद्वारे गावकऱ्यांना दिली गेली आहे. याच बरोबर गावातील दुकानदारानाही विश्वासात घेण्यात आले असून गावकऱ्यांना कुठल्याही गोष्टीची चणचण भासू नये म्हणून या दुकानदारांना ही मदत केली जाते. दुकानदारांचा माल त्यांना तालुक्यातून आणून देण्यासाठीही एका वाहनाची व्यवस्था केली गेली आहे. गावातील नागरिक वस्तू खरेदीसाठी घराबाहेर पडू नये त्यासाठी त्यांना सर्व वस्तू  घरपोच  केल्या जात आहेत. त्यामुळे एखाद्या शहरासारखी  वितरण व्यवस्था पंचनदी गावांमध्ये राबवली जात आहे.  पंचनदी करांचा  हा आदर्श आता इतर गावातूनही राबविला जात आहे

loading image
go to top