रत्नागिरीसह या तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या अधिक ; एका दिवसात 222 पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 September 2020

आरटीपीसीआरमध्ये 60 तर अ‍ॅण्टीजेनमध्ये 162 रुग्ण बाधित आलेत. मंडणगडात एकही रुग्ण नाही

रत्नागिरी : टाळेबंदी उठल्यानंतर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण दररोज वाढत आहेत. रविवारी प्राप्त झालेल्या अहवालात जिल्ह्यात 222 पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामध्ये रत्नागिरी, चिपळूण तालुक्यातील सर्वाधिक रुग्ण आहेत. चोविस तासात एक रुग्ण मृत्यू पावला असून गेल्या चार दिवसातील आठ जणांची कोरोना मृतांमध्ये नोंद झाली आहे. त्यामुळे एकुण मृतांचा आकडा 168 झाला आहे.

रविवारी सायंकाळपर्यंत आलेल्या अहवालानुसार आरटीपीसीआरमध्ये 60 तर अ‍ॅण्टीजेनमध्ये 162 रुग्ण बाधित आलेत. मंडणगडात एकही रुग्ण नाही. रत्नागिरीत 98 रुग्ण तर सलग पाचव्या दिवशी चिपळूणात 63 बाधित सापडले आहेत. या दोनच तालुक्यातील कोरोना बाधितांचा लक्षणीय आहे. अन्य तालुक्यांपैकी दापोली 1, खेड 11, गुहागर 21, संगमेश्‍वर 4, लांजा 3, राजापुरात 2 रुग्ण आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या 5,985 आहे. गेल्या चोविस तासात जिल्ह्यातील 73 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. वक्रतुंड येथील हेल्थ केंद्रातील 40, घरडातील 8, खेडमधील 16, रत्नागिरी रुग्णालयातील 1 आणि कळंबणीतील 1 रुग्णाचा समावेश आहे.

हेही वाचा- घेतला अंदाज अन् बंद घरातून चोरट्याने मारला एक लाख 90 हजारांवर डल्ला ! -

जिल्ह्यात रविवारी रत्नागिरीतील एका 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर 12 सप्टेंबरला खेड तालुक्यातील तिघांचा, 10 सप्टेंबरला संगमेश्‍वर व चिपळूणातील प्रत्येकी एकाचा, 11 सप्टेंबरला रत्नागिरी व खेडमधील प्रत्येकी एक आणि 2 सप्टेंबरला गुहागरमधील एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. हे आकडे वाढल्यामुळे एकुण रुग्णांमध्ये वाढ झाली असून तो आकडा 168 झाला.

हेही वाचा- आता मासेमारी कशी करायची ;  हर्णैतील नौका दिघी, जयगडमध्येच -

दरम्यान, रत्नागिरी तालुका हा कोरोना बाधितांसाठीचा हॉटस्पॉट बनलेला आहे. शनिवारी रात्री आलेल्या अहवालात 98 नवे पॉझिटिव्ह रुग्ण रत्नागिरीतील आहेत. गोळप येथे तीन रुग्ण सापडले असून झाडगावात 4, नूतननगर 1, पावस धनगरवाडी 1, माळनाका 2, मारुती मंदिर 1, मारुती आळी 1, लांजेकर कम्पाउंड 1, संगमेश्वर 1, खालची आळी 1, गोडाऊन  स्टॉप 1, देवरुख 1, मालगुंड 1, झाडगाव शेरेनाका 1, शंखेश्वर पार्क 1, करबुडे 1, नाचणे 3, रेल्वे कॉलनी 1, शिरगाव 1, चिपळूण पोलीस क्वार्टर्स 1 आणि गावखडी येथे एक रुग्ण सापडला. तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव झाला नसला तरी शहर आणि परिसरात वाढणारी रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत आहे.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 patient found in ratnagiri Most patients found Chiplun taluka